कौशल्य चाचणी तथा सरळ प्रवेश प्रक्रीया द्वारे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश

गडचिरोली, (जिमाका) दि.२०:आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत ०९ क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली होती. या क्रीडा प्रबोधिनीमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य खेळाडू शोध मोहीम राबविली जात आहे.

 राज्यातील एकूण ९ क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी सरळ प्रवेश प्रक्रीया व कौशल्य चाचणी अंतर्गत निवासी व अनिवासी क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेश देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने भरती प्रक्रीया सुरू करणार आहे. यासाठी दिनांक २७ ते ३० एप्रिल, २०२६ या कालावधीत विभागस्तरावर चाचण्यांचे आयोजन करुन खेळाडूंची निवड राज्यस्तर चाचणी करीता केली जाणार आहे. हँडबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नास्टिक ,बॅडमिंटन खेळामखेळा मधे सरळ प्रवेश व्दारे व हँडबॉल, जलतरण, सायकलिंग, फुटबॉल, ज्युदो, जिम्नास्टिक खेळामखेळा मधे कौशल्य चाचणी व्दारे प्रवेश देण्यात येणार आहे.हॉकी व मैदानी या खेळामघील खेळांडुना सरळ प्रवेश व कौशल्य चाचणी व्दारे प्रवेश देण्यात येणार आहे.

 ०७/०७/२००7 नंतर जन्मलेले व ज्या खेळाडूंचे वय ०८/०७/२०२6 रोजी 19 वर्षा आतील आहे अशा खेळाडूंची या निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा प्रबोधिनीच्या ठिकाणी शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, संतुलित आहार, निवास, अद्यावत क्रीडा सुविधा शासनाच्या वतीने मोफत पुरविल्या जाणार आहे. राज्यस्तरावर पदक प्राप्त केलेले खेळाडू किंवा राष्ट्रीय स्तरावर सहभागी खेळाडूंना संबंधित खेळाबाबतची चाचणी तज्ञ समिती समक्ष देऊन प्रवेश निश्चित केला जाईल. तसेच राज्यस्तरावर सहभागी खेळाडूंना खेळनिहाय कौशल्य चाचणीचे आयोजन करुन गुणानुक्रमे प्रवेश निश्चित केला जाईल.

 उपरोक्त क्रीडा प्रबोधिनीच्या चाचण्यांच्या प्रवेशासाठी इच्छूक खेळाडूंनी दिनांक २४ एप्रिल, २०२६ पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कॉम्पलेक्स एरिया गडचिरोली येथे सादर करावा. अर्ज सादर करते वेळी खेळाडूंचे नाव, जिल्हा, खेळप्रकार, जन्म दिनांक, वय व क्रीडा कामगिरी या संबंधीत दस्ताएैवज अर्जा सोबत सादर करावा व जास्तीत जास्त संख्येणी खेळाडूंनी आपल्या नावाची नोंद करावी असे आहावन श्री. भास्कर घटाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.