प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी

सत्र २०२६- २७ करिता शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत इयता १ ली करिता प्रवेश सुचना

गडचिरोली, (जिमाका) दि.२१:“सन २०२६- २७ या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरीता शासनाची योजना असुन त्या करीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी जि. गडचिरोली या कार्यालयाअंतर्गत अनुसुचित जमातीचे (आदिवासी) प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रवेशाकरीता प्रसिध्द झालेल्या दिनांकापासुन प्रवेश अर्ज निःशुल्क वितरीत करण्यात येणार असून संपूर्ण भरलेले अर्ज दिनांक १५ मे २०२६ पर्यंत स्विकारले जातील. प्रवेशासंबंधीत पुढील अटी व शर्तीनुसार अर्ज करावे.

सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छुक विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा, विद्यार्थ्यांचे नाव सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. जर विद्यार्थ्यांचे पालक दारिद्र रेषे खालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले बी.पी. एल. प्रमाणपत्र जोडावे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छुक विद्यार्थ्याच्या पालकांच्या कुटुबाची वार्षिक उत्पनाची कमाल मर्यादा रुपये १,००,०००/-(अक्षरी एक लक्ष रुपये) इतकी असावी. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे शासन निर्णय १८ सप्टेंबर, २०२० च्या प्रमाणे असावे विद्यार्थ्यांचा जन्म तारखेचा दाखला जोडण्यात यावा. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडण्यात यावे. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड प्रमाणपत्र जोडण्यात यावे. विद्यार्थ्याचे पालक शासकीय / निमशासकीय नौकरीवर नसावे. तसे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रदद करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी समंतीपत्रक जोडावे व विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो जोडावे. विद्यार्थ्याचे पालक विधवा, घटस्फोट, निराधार, परित्यक्त्या असल्यास अर्जासोबत तसा पुरावा जोडण्यात यावा. निवड केलेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परित्यक्त्या पालकांच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. शासन निर्णयाप्रमाणे निवड प्रक्रीयेचा पूर्ण अधिकार प्रकल्पस्तरीय निवड समिती यांना राहील, शासन स्तरावरुन निवड झालेल्या शाळेत व मंजुर प्रवेश संख्येच्या अधिन राहुन विद्यार्थी निवड प्रक्रीया करण्यात येईल, मंजुर जागेपेक्षा जास्त प्रमाणात आवेदन प्राप्त झाल्यास ईश्वर चिड्डीद्वारे निवड प्रक्रीया केल्या जाईल. असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण), एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी यांनी कळविले आहे.

प्रवेश अर्ज खालील ठिकाणी निःशुल्क उपलब्ध आहेत.

१. कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी जि. गडचिरोली
२. सर्व शासकीय आश्रम शाळा/अनुदानित आश्रम शाळा / शासकीय मुला/मुलींचे वसतीगृह अहेरी) / मुलचेरा / सिरोंचा जि. गडचिरोली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.