आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा २५ एप्रिल रोजी गडचिरोली दौऱ्यावर

गडचिरोली, (जिमाका) दि. २३ : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचा दिनांक २५ एप्रिल रोजी गडचिरोली येथे दौऱ्यावर येत असून या दौऱ्यादरम्यान ते शासकीय आश्रमशाळांतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासंदर्भातील उपाययोजनांवरील कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात धान खरेदीच्या अनुषंगाने आढावा बैठकही घेण्यात येणार आहे.

 दौरा कार्यक्रमानुसार, शनिवार दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजता शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे आगमन व राखीव. त्यानंतर सकाळी ९ वाजता शासकीय आश्रमशाळांतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत आयोजित कार्यशाळेत महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड, गडचिरोली येथे उपस्थित. दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे धान खरेदीच्या अनुषंगाने आढावा बैठकीस उपस्थित. सायंकाळी सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.