नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.
एटापल्ली (प्रतिनिधी): एटापल्ली नगरपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर लावण्यात आलेले भारतीय न्याय संहिता (BNS) कायद्यावरील बॅनर चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. सामान्य जनतेमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या बॅनरविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) व ऑल इंडिया युथ फेडरेशन (AIYF)ने तीव्र निषेध व्यक्त केला असून,नगराध्यक्ष व नगरपंचायत अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर बॅनरमध्ये BNS अंतर्गत काही निवडक कलमे जसे की – कलम 69 (सरकारी कामात अडथळा), कलम 356 (वाद घालणे), कलम 117 व 120 (मारहाण), कलम 324 (गर्दी करणे) आदींचा उल्लेख करत, सरकारी कर्मचाऱ्यांना अडथळा आणल्यास शिक्षेची भीती दाखवण्यात आली आहे. भाकपाचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार यांनी म्हटले. सदर बॅनर शासन निर्णयाशिवाय लावण्यात आला असून, तो बेकायदेशीर आहे. नगरपंचायत सारख्या शासकीय व सार्वजनिक कार्यालयात असा बॅनर लावणे म्हणजेच जनतेला दडपून टाकण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी पुढे सांगितले की, हा बॅनर लोकशाही मूल्यांच्या विरोधात असून, जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात आहे. नागरिक जर कार्यालयात येऊ...