वन विभाग नाक्यासमोरील वस्तीत भीषण अपघात- विद्युत खांबाला धडक; विजेचा खांब वाकला, सुदैवाने जीवितहानी टळली.
एटापल्ली दि-28/07/2025 – रविवारी रात्रीच्या सुमारास एटापल्ली येथील वन विभागाच्या नाक्यासमोरील वस्तीत एक भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने निघालेल्या Mahindra Bolero Neo (क्रमांक MH33 AC 7730) या चारचाकी वाहनाने नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला जबर धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की विजेचा खांब पूर्णपणे वाकून गेला असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या वाहनामध्ये लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनीचे काही कर्मचारी प्रवास करत होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. सदर अपघातग्रस्त वाहन देखील संबंधित कंपनीचेच असल्याचे सांगितले जात आहे.
सदर वाहन कंपनीचे असल्यामुळे पोलिस विभाग यावर कारवाई करणार का नाही? याबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र चर्चेला सुरुवात झाली असुन ग्रामस्थ व स्थानिक नागरिक याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. विशेष म्हणजे, याआधी गावातील इतर काही वाहनांवर पोलिसांनी तत्काळ कार्यवाही केली होती, त्यामुळे एकसमान न्याय आणि उत्तरदायित्वाची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा