काँग्रेस नगराध्यक्ष व नगरसेवकांनीच काँग्रेस खासदारांचा आदेश झुगारला? शौचालय प्रश्नावरून टाळा खोलो आंदोलनाची चेतावनी..


एटापल्ली   (जि. गडचिरोली) 
एटापल्ली नगरपंचायतमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता असून, नगराध्यक्षही काँग्रेसच्या आहेत. मात्र तरीही स्वतःच्याच पक्षाच्या खासदारांच्या स्पष्ट आदेशालाही काँग्रेस नगरसेवक व नगराध्यक्षांनी दुय्यम स्थान दिले.असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
दोन वर्षांपासून बंद असलेले बसस्थानकावरील सार्वजनिक शौचालय अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. त्यामुळे अखिल भारतीय महिला फेडरेशनने टाळा खोलो आंदोलन  उभारण्याचा इशारा दिला आहे.

खासदारांचा आदेश तरीही दुर्लक्षित.

महत्वाचे म्हणजे, एका वर्षापूर्वी तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीदरम्यान काँग्रेसचे खासदार स्वतः उपस्थित होते.या बैठकीत सर्व काँग्रेस नगरसेवक स्टेजवर व काही खाली बसलेले होते. त्या बैठकीत खासदारांनी थेट मुख्याधिकारी यांना शौचालय १५ दिवसांत सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते आणि हे सगळं जनतेसमोर खुले आम घडलं.

त्यांच्याच पक्षाच्या आदेशालाही किंमत नाही?

हे दृश्य डोळ्यांनी पाहिल्यानंतर देखील वर्षभरात कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे काँग्रेस नगरसेवक आणि नगराध्यक्ष प्रशासनावर प्रभावही टाकू शकत नाहीत की त्यांना जनतेच्या गरजांशी काही देणेघेणेच नाही.असा सवाल उपस्थित होतो.

महिला फेडरेशनचा रोष वाढतोय.

कॉ. गीता दासरवार (उपाध्यक्ष, अखिल भारतीय महिला फेडरेशन) व कॉ.अश्विनी गुज्जलवार-कंगाली तालुका संयोजक  यांनी निवेदनात म्हटले आहे की, महिलांना खुले मैदान गाठण्याची वेळ येत आहे, आणि सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी याकडे डोळेझाक करत आहेत. ही केवळ उदासीनता नसून अपमान आहे. आणि स्वच्छ भारत मिशन चा मज्जाक उडाला आहे


फेडरेशनच्या प्रमुख मागण्या.

1.शौचालय अद्याप सुरू का झाले नाही, याचे लेखी स्पष्टीकरण.
2.सुरु करण्यासंबंधी सुरु असलेली कार्यवाही सविस्तर सांगावी.


शासनाला अल्टिमेटम:
जर लवकरात लवकर शौचालय सुरू झाले नाही, तर बस स्थानक परिसरात आंदोलन छेडले जाईल आणि टाळा तोडून जनतेकडून वापर सुरू करण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.