मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यातून वाचले, पण शेवटचा श्वास घेता घेता हरणाचा मृत्यू…!
अहेरी (जिल्हा गडचिरोली) - अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे असलेल्या वाहतूक व विपणन बल्लारशहा वनपरिक्षेत्र अधिकारी, मध्यवर्ती काष्ठ भांडार आगार क्र. 03 आलापल्ली या डेपो परिसरात एक हरण मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
सदर घटनेनंतर डेपोमध्ये कार्यरत वनपाल व वनकर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवले. लगेचच त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष भोयर यांच्याशी संपर्क साधून उपचारासाठी बोलावले. डॉक्टरांनी आपल्या परीने सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र हरणाला वाचवण्यात यश आले नाही आणि त्याला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी पंचनामा करून नैसर्गिक नियमांनुसार, मृत हरणाचे शव जंगलातच विधीपूर्वक जाळून नष्ट करण्यात आले. यावेळी वनपाल जंबोजवार, परिचर निलेश गंगावने, तसेच अन्य वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 10 जुलै 2025 रोजी दहन प्रक्रिया Forest Depot No. 3 मध्ये पार पडली.
ही घटना वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी चिंता व्यक्त करणारी असून मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण आणणे ही काळाची गरज आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा