थेट जनतेच्या हक्कासाठी लढणाऱ्या पत्रकाराची मोठी झेप! मारोती कोलावार यांची 'खबरदार महाराष्ट्र'च्या संपादकपदी वर्णी.

मारोती कोलवार यांची खबरदार महाराष्ट्र न्यूज़ मध्ये 
संपादकपदी वर्णी

गडचिरोली;- अतिदुर्गम, अतिमागास आणि संधींपासून वंचित अशा गडचिरोली जिल्ह्यातून आपल्या ठोस आणि थेट बातमी शैलीतून नागरिकांच्या समस्या शासन दरबारी पोहोचवणारे तेजतर्रार पत्रकार मारोती कोलावार यांची आता 'खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क'च्या संपादकपदी वर्णी लागली आहे.

कोलावार यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून केवळ बातम्या नव्हे, तर एक चळवळ निर्माण केली. आदिवासी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडत, विविध प्रशासकीय यंत्रणांना जागं करणारी पत्रकारिता त्यांनी सातत्याने केली.

त्यांच्या नेतृत्वाखाली 'खबरदार महाराष्ट्र' अधिक सक्षम, ठोस आणि जनतेशी बांधिलकी ठेवणारा माध्यम मंच बनेल, असा विश्वास अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

'खबरदार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क'ने अल्पावधीतच ग्रामीण भागात विश्वासार्हता मिळवलेली असताना, आता संपादक म्हणून मारोती कोलावार यांच्या आगमनामुळे हे माध्यम अधिक ताकदीने जनतेच्या प्रश्नांसाठी सज्ज होईल, अशीच चर्चा सुरू आहे.

थेट, निर्भीड आणि अस्सल पत्रकारितेच्या प्रवाहात एक नवीन अध्याय सुरू होत आहे…!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.