गोटूलचा अपमान सहन करणार नाही. ऑल इंडिया आदिवासी महासभा आक्रमक प्रशासनाकडे केली कार्यवाहीची मागणी.

एटापल्ली, ता. १२ जुलै 
एटापल्ली शहरातील पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक केंद्र गोटूल मध्ये जनावरं ठेवण्यात आल्याच्या घटनेनं आदिवासी समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकाराचा कम्युनिस्ट पक्षाची जनसंघटना ऑल इंडिया आदिवासी महासभेच्या वतीने आज उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र निषेध करण्यात आला.

गोटूल ही आमच्या श्रद्धेची, परंपरेची व सामाजिक एकतेची जागा असून तिथे धार्मिक विधी, समाज चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. अशा पवित्र ठिकाणी जनावरं ठेवणं म्हणजे आदिवासी अस्मितेवर थेट घाव आहे असं मत तालुका संयोजक कॉ.अश्विनी कंगाली  यांनी व्यक्त केलं.
महासभेने प्रशासनाकडे चार प्रमुख मागण्या केल्या आहेत.

1. दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी.
2. गोटूलची तात्काळ स्वच्छता करून सांस्कृतिक पवित्रता पुनर्संचयित करावी.
3. अशा घटनांवर प्रतिबंध करण्यासाठी स्पष्ट नियमावली तयार करावी.
4. आदिवासी समाजाची अधिकृतरीत्या माफी मागावी.

या घटनेने पुन्हा एकदा आदिवासी परंपरांवर होणाऱ्या अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून,"निषेध! निषेध! निषेध!"अशा घोषणांनी कार्यालय परिसर दणाणून गेला.

स्थानिक प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन त्वरित कारवाई करावी, अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाच्या जनसंघटनेतून करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.