पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आज जिल्ह्यात 33 नवीन कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : - दि.28:आज जिल्हयात 33 नवीन  कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 13 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9568 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 9344 वर पोहचली. तसेच सद्या 118 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 106 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.66 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 1.23 टक्के तर मृत्यू दर 1.11 टक्के झाला.         नवीन 33 बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील 31 जणाचा समावेश असून अहेरी तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील 1, जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 13 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 9,  चामोर्शी तालुक्यातील 2, धानोरा तालुक्यातील 1, तर मुलचेरा तालुक्यातील 1 जणांचा समावेश आहे.      नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील साईनगर 1, नवेगाव कॉम्पलेक्स 2,  कोटगल रोड 5, सीआरपीएफ जवान 1, गोकुलनगर 3, पी डब्ल्यु कॉलनी 1, झेड पी 16, स्थानिक 1,...

ग्राम पंचायत-बुर्गी येथे १५ वर्षा नंतर नाविस समर्पित भाजपाचे उमेदवार श्री विलास गावडे यांचे सरपंच खुर्चीवर विराजमान.

इमेज
दिक्षा झाडे - एटापल्ली तालुका प्रतिनिधी एटापल्ली : - ग्राम पंचायत-बुर्गी येथे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली दि : - २६/०२/२०२१ रोजी ग्राम पंचायत कार्यालय-बुर्गी येथे १५ वर्षानंतर नाविस समर्पित भाजपाचे नवनिर्वाचित सरपंच श्री विलास गावडे हे सरपंच खुर्ची वर विराजमान झाले आहेत. नवनिर्वाचित सरपंच श्री विलास गावडे यांची सर्व जनते समोर शपथविधी पार पाडण्यात आली.  यावेळी जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जमाती मोर्चा भाजपा गडचिरोली तथा सरपंच श्री प्रशांत आत्राम, ग्राम पंचायत तोडसा, माजी सरपंच रैनेंंद्र येमला ग्राम पंचायत तुमरगुंडा, उसण्णा मेडीवार सामाजिक कार्यकर्ता व ग्राम पंचायत सदस्य गणेश गावडे, उमेश गावडे, कल्पना तलांडे, प्रिती कालंगा, तसेच गावातील नागरिक रमेश गावडे, कुमार सुरेंद्र व इतर मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाकडून नियमांची कडक स्वरूपात अंमलबजावणी.

इमेज
दंडात्मक कारवाईसह सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळे निर्बंध लागू. गडचिरोली : - दि.26:  जिल्हयात कोरोना संख्येत होत असलेल्या वाढीमूळे जिल्हा प्रशासनाकडून कोरोना रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी अजूनही कडक स्वरूपात राबविण्यात येणार आहे. कोरोना बाबत जिल्हयातील सर्व प्रशासकिय यंत्रणांची ऑनलाईन आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद व प्रभारी जिल्हाधिकारी तथा अति.जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी जिल्हयातील सर्व उप विभागीय दंडाअधिकारी, तहसिलदार व गट विकास अधिकारी यांचा कोरोना बाबत आढावा घेतला. या बैठकित कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत निर्गमित केलेल्या सूचनांची अंमलबजावणी अधिक चांगल्या प्रकारे राबविण्याच्या सूचना कुमार आशिर्वाद यांनी उपस्थितांना दिल्या.  संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यात कोरोना रूग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतही कोरोना रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामूळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून या पुर्वी दिलेल्या आदेशांची अंम...

जात प्रमाणपत्र पडताळणी करीता ऑनलाईनवेबीनारचे (Webinar) आयोजन.

इमेज
गडचिरोली : - दि.26: जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिये संदर्भात गडचिरोली जिल्हयातील उमेदवारांना माहिती व्हावी करीता सदरचे ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) बाबत जनजागृती व्हावी, जेणेकरुन सर्वसामान्य लोकापर्यत जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतची माहिती उदा. अर्ज कोणत्या प्रकारे भरावे, कोणत्या प्रकारचे दस्ताऐवज जोडावे, इ. मिळावी व अर्जदारास अर्ज सादर करताना ऑनलाईन सुविधेचा अचुकपणे /प्रभावीपणे वापर करणे शक्य होईल.          त्यानुषंगाने समितीस्तरावर ऑनलाईन वेबीनारचे  (Webinar) आयोजन गुरुवार, दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आले होते.  परंतु गडचिरोली जिल्ह्यात या वेबीनार मध्ये मोठया प्रमाणात उमेदवारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही म्हणून पुनश्च ऑनलाईन वेबीनारचे आयोजन गुरुवार, दि.04 मार्च 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आलेले आहे.          वेबीनारचे (Webinar) लींक पुढील प्रमाणे आहे. https://meet.google.com/iyd-sryu-pst  असा आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेश पांडे यांनी कळव...

ग्रामपंचायत निवडणुकीत मागास वर्गासाठी राखीव असलेल्या जागेवर निवडुन आलेल्या उमेदवारांसाठी विशेष सूचना.

इमेज
गडचिरोली : - दि.26: राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यातील 14,234 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निवडणुक कार्यक्रम घोषित केला होता. गडचिरोली जिल्हयातील काही ग्रामपंचायतींचा यात समावेश होता व त्यानुसार माहे एप्रिल, 2020 व त्यानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्यसंस्था / ग्रामपंचायत निवडणुकीत मागासवर्गीयांसाठी राखीव जागेवर निवडणुक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपले जाती दावा पडताळणीचे मॅन्युअली अर्ज माहे फेब्रुवारी व मार्च 2020 मध्ये या समितीकडे सादर केलेले होते.  तसेच कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव होवू नये म्हणून सदर निवडणुक कार्यक्रम स्थगीत करण्यात आला. सदरचे अर्ज परिपूर्ण नसल्यामुळे समितीद्वारे ते अर्ज नस्तीबध्द केलेले आहेत. मात्र माहे डिसेंबर 2020 मध्ये निवडणुक आयोगाने सुधारीत निवडणुक कार्यक्रमानुसार माहे जानेवारी 2021 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी माहे फेब्रुवारी व मार्च 2020 मध्ये जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर करताना समितीकडून देण्यात आलेली पावती टोकन निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रासोबत संलग्न करण्यात आली. तथापि, समितीने त्यांचे अपूर्ण ऑफलाईन अर्ज नस्...

चामोर्शी तालूक्यात निराधार योजनेची 168 प्रकरणे मंजूर.

इमेज
गडचिरोली : - दि.25: राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरीक व मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्ती, निराधार, विधवा, परीतक्त्या, देवदासी महिला, अनाथ बालके इत्यादी यांचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी त्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मासिक अर्थसहाय्य देण्यात येते. योजनांचा लाभ अधिकाधिक नागरीकांपर्यंत पोहचविण्याकरीता चामोर्शी तालुक्यातील महाराजस्व अभियान तथा समाधान शिबीर अंतर्गत जनजागृती करुन लाभार्थ्यांचे विहित नमुन्यात अर्ज भरुन घेण्यात येतात. वरील योजनेच्या लाभार्थ्यांकडून प्राप्त झालेले अर्ज दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष चामोर्शीचे तहसिलदार जितेंद्र शिकतोडे, ना.तह.संगांयो, दिलीप ग. दुधबळे, क.लि. कु.डी.सी. सहारे यांचे उपस्थितीत सभा आयोजित करुन पुढील प्रमाणे अर्ज  मंजूर- नामंजूर करण्यात आले. संजय गांधी योजना समितीसमोर ठेवण्यात आलेल्या प्रकरणाची माहिती श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन य...

सोमवारला लोकशाही दिनाचे आयोजन.

इमेज
गडचिरोली : - दि.25: सोमवार, दिनांक 01 मार्च 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहात  लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत आहे.  सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी 2.00 ते 3.00 वाजेपर्यंत राहील. आणि सभेला 3.00 वाजता सुरुवात होईल. ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त  झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडुन जिल्हास्तरावर दिनांक  01 मार्च 2021 रोजी  होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-1 अ ते 1 ड) दोन प्रतीत दाखल करणे आवश्यक राहिल.  तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी. अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करुन सामाजिक अंतर, मास्क वापरणे  अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लोकशाही दिन, गडचिरोली यांनी कळविले आहे.

मराठीचा प्रचार-प्रसार करणाऱ्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूतांचा गौरव.

इमेज
मुंबई : -  दि. 23 : आरोग्य व शिक्षण क्षेत्रात समाजमाध्यमांद्वारे विविध उपक्रम राबवून मराठी भाषेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयामधील प्रतिनिधींचा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुंबईतील अमेरिकन महावाणिज्यदूत कार्यालयातील प्रतिनिधींनी मागील काही दिवसांत समाज माध्यमांद्वारे विविध उपक्रम राबविले. यामध्ये विकिपीडीयाच्या माध्यमातून मराठी भाषेतून आरोग्यविषयक माहिती प्रसारित केली. यासोबत विविध चित्रफिती तयार करून समाजमाध्यमांद्वारे प्रर्दशित केल्या. हे करताना मराठी चित्रपटातील लोकप्रिय संवाद याद्वारे संक्षिप्त चित्रफिती तयार केली. या कार्यासाठी मुंबईतील अमेरिकन राजदूत जे. रँझ, प्रवक्ते नीक नोव्हाक, वरिष्ठ अधिकारी श्रीमती ऋना राठोड यांचा श्री. देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मराठी भाषेचा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार, प्रसार करण्यासाठी महावाणिज्यदूतावासामधील प्रतिनिधी करत असलेले काम उल्लेखनीय असल्याचे गौरवोद्गार श्री. देसाई यांनी यावेळी काढले. यापुढे अमेरिकेतील मराठी मुलांना महाराष्ट्रातून ऑन...

तक्रार असलेल्या शाळांची शिक्षणाधिकाऱ्यां मार्फत चौकशी - शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड.

इमेज
मुंबई : -  दि. 23 : कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असताना काही शाळांकडून अन्यायकारक फी वसुलीसाठी तगादा लावणे ज्या विद्यार्थ्यानी फी भरली नाही त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून बाहेर काढणे, मागील सत्र परीक्षेची गुणपत्रिका न देणे, उशिरा फी भरणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दंड वसूल करणे अशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत ज्या शाळांसंदर्भात अशा तक्रारी आहेत त्या शाळांची संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत त्वरित चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी  दिले आहेत. शालेय शिक्षण मंत्री प्रा. गायकवाड यांच्या दालनात नुकतीच  शालेय शुल्क वाढीसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस अपर मुख्य सचिव, शिक्षण आयुक्त, सचिव, विधी व न्याय विभाग, सहसचिव, विधी (शालेय शिक्षण) व पॅरेंट्स असोसिएशनचे पदाधिकारी श्री.जयंत जैन, श्री. प्रसाद तुळसकर, श्री. सुनिल चौधरी, श्रीमती जयश्री देशपांडे, श्रीमती सुषमा गोराणे, इंजि. नाविद बेताब व अॅड अरविंद तिवारी उपस्थित होते. बैठकीमध्ये शाळांच्या शुल्कासंबधीत विषयांवर चर्चा करण्यात ...

यंदाच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा - कृषीमंत्री दादाजी भुसे यांची केंद्रीय खते व रसायने मंत्र्यांकडे मागणी

इमेज
नवी दिल्ली : -  दि. 23 : महाराष्ट्रासाठी या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यक असणारा खत पुरवठा वेळेवर आणि मागणीप्रमाणे करावा, अशी मागणी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा यांच्याकडे आज केली. कृषीमंत्री श्री.भुसे आज नवी दिल्ली येथील दौऱ्यावर गेले असून त्यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांबाबत त्यांनी चर्चा केली. राज्याचे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यावेळी उपस्थित होते. राज्याला खरीप हंगामासाठी सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खताची आवश्यकता असून त्याचा पुरवठा केंद्राकडून केला जातो. खरीप हंगामासाठी जून आणि जुलै महिन्यात खताला मोठ्या प्रमाणावर मागणी असते. गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये जून ते ऑगस्ट या कालावधीत खत पुरवठा विस्कळीत झाला होता. यंदाच्या खरीप हंगामासाठी राज्य शासन 2 लाख मेट्रीक टन युरियाचा अतिरिक्त साठा करणार असून विविध खतांची सुमारे 44.50 लाख मेट्रीक टन खत पुरवठ्याची मागणी केंद्र शासनाकडे आज झालेल्या भेटीत करण्यात आली आहे. खतांचा पुरवठा वेळेत व्हावा अशी ...

जात प्रमाणपत्र पडताळणी करीता ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) आयोजन.

इमेज
गडचिरोली : -  दि.23: गडचिरोली जिल्हयातील उमेदवारांना सदरचे ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) बाबत जनजागृती व्हावी, जेणेकरुन सर्वसामान्य लोकापर्यत जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतची माहिती ( उदा. अर्ज कोणत्या प्रकारे भरावे, कोणत्या प्रकारचे दस्ताऐवज जोडावे, इ.) मिळावी व अर्जदारास अर्ज सादर करताना ऑनलाईन सुविधेचा अचुकपणे /प्रभावीपणे वापर करणे शक्य होईल.          त्यानुषंगाने समितीस्तरावर ऑनलाईन वेबीनारचे  (Webinar) आयोजन गुरुवार, दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आलेले आहे. वेबीनारचे (Webinar) लींक पुढील प्रमाणे आहे. https://us05web.zoom.us/j/82111348994?pwd=dyt1TTJ4TDI4U1dnMUM5TFI1cmk4Zz09ZOOM Meeting   युजर आय.डी -82111348994  पासकोड - v3E2nk  असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेश पांडे यांनी कळविले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत गाडगेबाबा महाराजांना जयंती निमित्त अभिवादन 'गाडगेबाबांची दशसुत्री समाजकार्याची प्रेरणा'.

इमेज
मुंबई : -  दि. 23 : थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा महाराज यांना जंयती निमित्त मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. ‘संत गाडगेबाबा यांची दशसुत्री आमच्यासाठी समाज कार्याची प्रेरणा आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी अभिवादनात नमूद केले आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, 'संत गाडगेबाबा यांनी संपूर्ण आयुष्य समाज शिक्षणासाठी वेचले. त्यांनी वाईट रूढी-प्रथांना झटकून टाका असे सांगतानाच, माणसाच्या मुलभूत गरजांसह शिक्षण, रोजगार, आरोग्य, पर्यावरण अशा गोष्टींबाबत देखील परखड भाष्य केले आहे. त्यासाठी समाजाला दशसुत्रीही दिली आहे.  ही दशसुत्री समाजाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मार्गदर्शक अशीच आहे. संत गाडगेबाबा यांचे जीवन मोठा अभ्यासाचा विषय आहे. त्यातून नव्या पिढीलाही खूप काही शिकता येईल. आमच्यासाठीही संत गाडगेबाबा यांची दशसुत्रीच समाज कार्याची प्रेरणा आहे. या दशसुत्रीला प्रमाण मानूनच आमची वाटचाल सुरु आहे. संत गाडगेबा...

बाळशास्त्री जांम्बेकर यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी.

इमेज
गडचिरोली : -  दि.1 9 :  बाळशास्त्री जांम्बेकर    यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी आस्थापना तहसिलदार के.एस. भांडारकर  यांनी   बाळशास्त्री जांम्बेकर   यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .   यावेळी डि.जी. जुकनाके, डी.ए.ठाकरे, मानिक गो.रणदिवे, व्ही.बी. चहोदे, डब्लु .एच. कोलटकर, सौ.शारदा कार्लेकर, सौ. मंमता बांबोडे, सौ. मगला मेश्राम आदि. कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व अधिकारी / कर्मचारी, वृंदानी  बाळशास्त्री जांम्बेकर  यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

ग्राम पंचायत कार्यालय, नागेपल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी.

इमेज
अहेरी : - दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज ग्राम पंचायत कार्यालय, नागेपल्ली येथे साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच श्री लक्ष्मण कोडापे, उपसरपंच श्री रमेश शानगोंडावार यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी श्री संतोष अग्रवाल, आशिष पाटील ग्रा.प सदस्य, किरण खोब्रागडे, स्वपनील मद्देलवार, अमोल आत्राम, धम्मपाल दहागावकर, आशिष बोरुले, प्रभाकर जनगम, अशोक कोडापे, नामदेव वाघाडे ग्रा.प कर्मचारी उपस्थित होते.  उपस्थित सर्व पदाअधिकारी / कर्मचारी व गावातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी.

इमेज
गडचिरोली : -  दि.19: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे साजरी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी विजया जाधव  यांनी छत्रपती शिवाजी महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी प्र. तहसिलदार किशोर भाडांरकर, जिल्हा नाझर डी.ए. ठाकरे, श्री. सोरते, व्ही.बी.दुधबळे,  महेंद्र वट्टी,  श्री. चहांदे, जिल्हा माहिती कार्यालयातील मनोहर बेले आदि. कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.  उपस्थित सर्व अधिकारी / कर्मचारी, वृंदानी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

महाडीबीटी द्वारे कृषि योजनांसाठी निवड झालेल्या शेतक-यांना कागदपत्र ऑनलाईन करण्याचे आवाहन.

इमेज
गडचिरोली : -  दि.18: राज्य शासना कडून महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत विविध कृषि विषयक योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी आपल्या नावाची एकदाच नोंदणी करावयाची असून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांचा लाभ त्यांना घेता येणार आहे. सदर सुविधा कार्यान्वित केल्याचे सन 2020-21 हे पहिले वर्ष आहे. कृषि विभागाने वरील पोर्टल वर अर्ज करण्यासाठी 11 जानेवारी ही अंतिम तारीख घोषित केली होती. त्यानुसार प्राप्त सर्व अर्जासाठी लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्याने कृषि यांत्रिकीकरण, अनुसूचित जाती / अनुसूचित जमातीसाठी नवीन विहीर, कांदाचाळ, प्लॅस्टिक मल्चिंग, सूक्ष्म सिंचन इत्यादी योजनांचा समावेश आहे. निवड झालेल्या शेतकरी बंधूंना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर लघुसंदेश देण्यात आले आहे. निवड झाल्याचा संदेश ज्या शेतकऱ्यांना/लाभार्थिंना प्राप्त झाला आहे. त्यांनी महाडीबीटी पोर्टल आता पुढिल प्रक्रिया पार पाडावी असे आवाहल कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.         महा-डीब...

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप योजना.

इमेज
गडचिरोली : -  दि.18: गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप करणे या योजनेअंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल व रु. 500/- इतक रोख अनुदान देणे . या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत.         अर्जदार हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. व गटई कामगार असावा, अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात रु. 40,000/- व शहरी भागात रु.50,000/- पेक्षा अधिक नसावे .(यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहील) , अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत , नगरपालीका, छावणी बोर्ड, (कॅन्टॉन्मेंट बोर्ड ) किंवा महानगरपालीका यांनी त्यास भाडयाने,कराराने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वमालकीची असावी.         अधिक माहितीकरीता व अर्जाकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गडचिरोली कार्यालयाशी संपर्क...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत जमिन विक्रीचे प्रस्ताव आमंत्रित.

इमेज
गडचिरोली : -  दि.18: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटूंबाला  शासनामार्फत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर ओलिताखालील जमीन 100 % अनुदानावर उपलब्ध करुन द्यावयाची आहे.त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांना जमीन  विकावयाची आहे, त्यांनी विकत असलेल्या जमिनीचा  सातबारा ( 7/12 ) जमिनीचा नकाशा, धारण करीत असलेल्या जमिनीचा तपशिल (नमुना 8 अ), जमीन मोजणीची ' क ' प्रत, गांव नकाशा, 100 रुपयाचे स्टॅम्पपेपरवर शपथपत्र इ. माहितीसह प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयास सादर करावा. शासन निर्णय दिनांक 14 ऑगस्ट 2018 नुसार जमीन खरेदीची कार्यवाही करण्यात येईल.  अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा. असे  आवाहन एका पत्रकान्वये  केले आहे.

शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन.

इमेज
गडचिरोली : -  दि.18: राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता उपाययोजनेचा एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जयंती अर्थात शिवजयंती हा सण/ उत्सव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्यानुसार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जिल्हयात मोठया प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.              जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली दीपक सिंगला यांनी वरील संदर्भ क्र.03 चे शासन परिपत्रकातील निर्देशाच्या अधिन राहून शासन निर्देशान्वये कोविड -19 साथरोग अंतर्गत जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये कोविड-19 मुळे उद्भ्वलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी दिनांक 19 फेब्रुवारी, 2021 रोजीचा छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने पुढील प्रमाणे मार्गदर्शक सुचना करण्यात येत आहे. एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात परंतु यावर्षी कोविड -19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठया प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयं...

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून भामरागड 100 टक्के सामुहिक वनहक्क दावे मंजूर झालेला तालुका.

इमेज
दुर्गम बिनागुंडा परिसरातील उर्वरीत सामुहिक वनहक्क दावेही मंजूर गडचिरोली : -  दि.18: भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावे बिनागुंडा, कुव्वाकोडी पेरमलभट्टी, दामनमर्का, पुंगासूर, तुर्रेमर्का व फोदेवाडा या गावातील लोकांनी मागील 8 ते 9 वर्षापासून अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियमांतर्गत सामुहिक वन हक्क मिळण्यापासून वंचित होते. अखेर जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी याबाबत लक्ष घालून तसेच भामरागड येथे प्रत्यक्ष भेट देवून या विषयला अंतिम स्वरूप प्राप्त करून दिले. 17 फेब्रुवारी रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एटापल्ली मनुजकुमार जिंदाल यांचे हस्ते संबंधित गावातील लोकांना सामुहिक वनहक्क पट्टे बाबात पत्र देणेत आले. भामरागड तालुका हा मुख्यत्वे गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी, मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त तालुका म्हणून ओळखला जातो. हा तालुका अतिदुर्गम, डोंगरदऱ्यांनी व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे. हा तालुका बांबुकरीता प्रसिध्द आहे. तालुक्यातील लोकांचा व्यवसाय शेती असून शेती सोबतच जंगलातील वनोपजावर देखील त्यांचे जीवन अवलंबून आ...

वाढती मागणी लक्षात घेऊन अंबरनाथ शहरासाठी पुरेसा पाणीपुरवठा करावा - पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील.

इमेज
मुंबई : -  दि.१७ : अंबरनाथ शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यादृष्टीने अंबरनाथ शहर पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर करून शहरासाठी पुरेसा पाणीपुरवठा करावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.श्री.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत अंबरनाथ शहर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. चिखलोली धरणाचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करावे : - चिखलोली धरणाचे काम डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण करावे. या धरणाच्या वाढीव कामासाठी वन विभागाच्या परवानगीची गरज आहे.त्यामुळे जलसंपदा व वन विभागाने तातडीने संयुक्त बैठक घ्यावी. जीर्ण जलवाहिन्या असल्यास त्या बदलण्याचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी शासनाकडे सादर करावा व निधीची मागणी करावी असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी दिले. चिखलोली धरण क्षेत्रालगत असलेल्या रासायनिक कारखान्यांमधून विनाप्रक्रिया केलेले दूषित सांडपाणी धरणात सोडण्यात येत असल्याने शहरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या रसायनांचे योग्य पद्धतीने निस्सारण करण्याबाब...

नवा भारत मातृशक्तीचा असेल - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी.

इमेज
एसएनडीटी महिला विद्यापीठाचा दीक्षांत समारोह मुंबई : -  दि. 17 : प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत. कुलपती या नात्याने आपण उपस्थित असलेल्या प्रत्येक दीक्षांत समारोहात 5 सुवर्णपदके मुले तर 50 सुवर्णपदके मुली पटकावतात. त्यामुळे नवा भारत मातृशक्तीचा असेल, भगिनीशक्तीचा असेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.   श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 70 वा वार्षिक दीक्षांत समारंभ राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत बुधवारी (दि. 17) झाला.   यावेळी भारतीय शिक्षण मंडळाचे अखिल भारतीय संघटन मंत्री मुकुल कानिटकर, विद्यापीठाच्या कुलगुरू शशिकला वंजारी, प्रकुलगुरू विष्णु मगरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.   एसएनडीटी विद्यापीठाचे संस्थापक महर्षी कर्वे यांच्या स्मृतींना अभिवादन करून राज्यपाल श्री.कोश्यारी म्हणाले, शिक्षण केवळ अर्थार्जनासाठी न राहता ते मूल्यांवर आधारित असावे. स्नातकांनी आपल्या डोळ्यांपुढे उच्च ध्येय ठेवून तसेच नीतीमूल्ये, सदाचार, त्याग व सेवाभाव अंगीकार करून वाटचाल केल्यास त्यांच्...

राईस मिलर्सच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक, धानभरडाई लवकर करावी - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ.

इमेज
मुंबई : -  १६ : मागील अनेक दिवस पाचही जिल्ह्यात धानभरडाई सूरू नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे पण राईस मिलर्सच्या प्रश्नांबाबत देखील राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने मिलर्सबरोबर चर्चा करून अडचणी सोडवून ताबडतोब धानभरडाई सुरू करावी, असे आदेश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.  भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यातील राईस मिलर्सच्या अडचणी दूर करण्यासाठी व धानभरडाईबाबत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली.   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, राईस मिलर्सचे प्रश्न सोडविण्याबाबत राज्यसरकार सकारात्मक आहे. त्यांच्या हक्कावर कोणतीही गदा न आणता शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळावे व सामान्य नागरिकांना योग्य दर्जाचा तांदूळ मिळावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राईस मिलर्सने ६७% टक्के सीएमआर तांदूळ जमा करण्याची हमी द्यावी व ध...

पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारणार भव्य वसतीगृह- आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी.

इमेज
नऊ मजली इमारतीमध्ये 650 विद्यार्थ्यांची होणार सोय;  44 कोटींची प्रशासकीय मान्यता प्रदान. मुंबई : -  दि. 16 : राज्यभरातून पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना राहण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. यासंबंधी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून वसतीगृहाची मागणी केली जात होती. या मागणीची दखल घेतली. आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी पुण्यातील हडपसर भागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने या वसतीगृह इमारत बांधकामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. शैक्षणिक सोयीसुविधा असल्यामुळे राज्यभरातील विविध विद्यार्थी पुण्यात प्रवेश घेत असतात. त्याचप्रमाणे राज्यातील आदिवासी जमातीतील अनेक विद्यार्थी हे पुण्यातील विविध शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेतात. मात्र, प्रवेशानंतर अशा विद्यार्थ्यांना राहण्याची सोय होत नसल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. अशा विद्यार्थ्यांकडून वसतीगृह उभारण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्यांच्या मागणीची पूर्तता करण्याच्या दृ...

मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करावे- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे.

इमेज
मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत बैठक संपन्न मुंबई : -  दि. १६ : मुंबईतील उर्वरीत कोळीवाड्यांचे सीमांकन जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.  मुंबई शहर आणि उपनगरातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे आणि मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अस्लम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.  सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर यांच्यासह संबंधीत विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबईतील उर्वरित कोळीवाड्यांच्या सीमांकनासाठी करावयाची प्रक्रिया जलद पूर्ण करण्यात यावी. यासंदर्भात लवकरच पुन्हा आढावा बैठक घेऊन कोळीवाड्यांच्या सीमांकनाबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले. शहरचे पालकमंत्री श्री. अस्लम श...

मच्छीमारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या सलग बैठका.

इमेज
मुंबई : -  दि. 16 : मच्छिमार संघटना, संस्थांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सोमवारी (दि.15) सह्याद्री अतिथीगृहात सलग बैठक घेऊन मच्छिमारांच्या विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या. सागरी व भूजल मासेमारीशी निगडीत राज्यभरातील दहापेक्षा अधिक मच्छीमार संस्थांच्या विविध प्रतिनिधींनी या बैठकांना उपस्थित राहून आपली गाऱ्हाणी यावेळी मत्स्यव्यवसाय मंत्री श्री. शेख यांच्यापुढे मांडली. यावेळी विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव, अन्य वरिष्ठ अधिकारी व संबंधित अन्य विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. सकाळपासून सुरू झालेल्या या बैठकांचा क्रम हा रात्री 10 वाजेपर्यंत सुरू होता. मच्छीमार बांधवांच्या डिझेल परताव्याचा अनुशेष, ओएनजीसी सर्वेक्षणामुळे मासेमारीवर होणारा परिणाम,  न्हावा शेवा मुंबई ट्रान्स हार्बर क्रिक सी लिंक प्रकल्पबाधित मच्छिमारांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न, मत्स्य पॅकेजमधील अटी व शर्ती बदलून कुटुंबातील प्रत्येक क्रियाशील सभासदाला मत्स्य पॅकेजचा लाभ देणे, आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात येऊ घातलेला एलईडी मासेमारी बंदीचा कायदा व त्यातील कठोर दंडाच...

राज्या बाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील शेतकऱ्यांकडील दूध संकलन वाढवा - सुनिल केदार

इमेज
मुंबई : -  दि. 16 : विविध डेअरींच्या माध्यमातून राज्याबाहेरून दूध आणण्याऐवजी राज्यातील दूधसंकलन वाढवून राज्यातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिल्या. मंत्रालयात, नागपूर येथे मदर डेअरी मार्फत उभारण्यात येणाऱ्या दूधाचे विविध उत्पादन प्रकल्प तसेच अमूल व मदर डेअरींच्या मार्फत राज्यात करण्यात येणाऱ्या दूध संकलनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे आयुक्त एच.पी. तुम्मोड यांच्यासह अमुल डेअरीचे प्रतिनिधी समीर नागवले, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे अनिल हतेकर आणि मदर डेअरीचे प्रतिनिधी उपस्थित होते. श्री. केदार म्हणाले, मदर डेअरींने नागपूर येथे पाच लाख लिटर दूध संकलन करून त्याद्वारे दूधाचे विविध उत्पादने तयार करावीत. यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल. त्याचबरोबर गोंदिया व भंडारा या जिल्ह्यातही दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दूध संकलन करण्यास तत्काळ सुरुवात करावी, असेही सूचना त्यांनी दिल्या. राज्यात विविध प्रकारचे दूध उत्पादन होते. त्याविषयी माहिती घेण्यात येईल. र...

साडेतीन वर्षाच्या चिमुकलीने घेतला ‘कुसुमाग्रज काव्यवाचन उपक्रमा’त सहभाग.

इमेज
नवी दिल्ली : -  बालपणी टिव्ही कार्टून, मोबाईल गेममध्ये रमणा-या पिढीची  प्रतिनिधी तरीही यास अपवाद असलेली गडचिरोली जिल्हयाची विनंती झाडे साहित्यात रमणारी आहे. साडेतीन वर्षाच्या विनंतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता तोंडपाठ करून परिचय केंद्राच्या कविता वाचन उपक्रमात सहभाग नोंदवला. या उपक्रमात सहभागी होणारी ती सर्वात कमी वयाची साहित्यरसिक ठरली आहे. ‘मराठी भाषा गौरव दिन’ या ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कवी  वि.वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रजांच्या जयंती  दिनानिमित्ताने महाराष्ट्र परिचय केंद्राने कुसुमाग्रजांच्या कविता वाचनाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात राज्यातून व राज्याबाहेरूनही साहित्यरसिक सहभागी होत आहेत. या उपक्रमातील  वैशिष्टयपूर्ण बाब म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेड येथील विनंती झाडे या चिमुकलीचा सहभाग. बोबडे बोल असले तरी विनंतीने मात्र उत्तम लयीत ‘कणा’ ही कविता सादर करून या उपक्रमातील सर्वात लहान सहभागकर्तीचा मान मिळविला आहे.  चिमुकली विनंती दोन वर्षाची असल्यापासूनच बोलायला लागली व बडबडगीते, पाठयपुस्तकातील कविता ती आई वंदना झ...

‘लोकराज्य’चा फेब्रुवारीचा अंक प्रकाशित

इमेज
मुंबई : -  दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित लोकराज्यचा फेब्रुवारीचा अंक प्रकाशित झाला असून मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून अंकात मराठी भाषा, साहित्य  आणि बोली भाषांचे सर्वेक्षण या अनुषंगाने विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे. कुसुमाग्रज  अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मराठी भाषा विभाग राबवित असलेल्या योजना आणि उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती या अंकात दिली आहे. इतर भाषेतून आलेल्या शब्दांनी मराठी कशी समृद्ध केली याविषयीचा लेख, मराठी साहित्य, डिजिटल माध्यमातील मराठी, याबरोबरच वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारा विशेष लेख यांचा अंतर्भाव अंकात करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा, मंत्रिमंडळाने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांबरोबरच महत्त्वाच्या घडामोडींना अंकात स्थान देण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी काळजी आवश्यक आहे, लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे, त्यासंदर्भातील लेख आणि  कोरोना काळात अतिशय ऐतिहासिक झा...

आर. आर. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली.

इमेज
मुंबई : -  दि. 16 : ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ आणि ‘तंटामुक्त गाव अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलणारे, ‘आधुनिक गाडगेबाबा’ असा ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो ते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत आर. आर. पाटील उर्फ आबांचा आज स्मृतीदिन. लोककल्याणकारी निर्णयाने राज्यातल्या घराघरात पोहचलेल्या या लोकप्रिय नेतृत्वाला, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.  राज्यात डान्सबार बंदी, गुटखाबंदीच्या निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी, भ्रष्टाचारमुक्त पोलिस भरतीच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना पोलिस दलाची दारे खुली करणारे आर.आर.आबा त्यांच्या क्रांतिकारी निर्णयांसाठी राज्यातील जनतेच्या कायम स्मरणात राहतील.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.

32 वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन.

इमेज
गडचिरोली : -  दि.11: 32 वे रस्ता सुरक्षा अभियान, दि. 18 फेब्रुवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली तसेच पोलीस विभाग (वाहतुक शाखा), गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज, दि. 11 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 8.00 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली आर.एस. भुयार, यांचे मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा रॅली औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली ते गांधी चौक या दरम्यान काढण्यात आली. या रॅलीमध्ये कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, गडचिरोली विवेक मिश्रा यांनी रस्ता सुरक्षेचे महत्व विषद करत वाहन चालवतांना वेग मर्यादेचे पालन करणे आवश्यक असल्याचे नमुद केले. व भारतामध्ये अपघाताचे प्रमाण किती भयावह आहे याबाबत माहिती दिली. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळून अपघात टाळण्याचे आवाहन केले. तर मो.वा.नि. एस.एन. उचगांवकर यांनी अपघात कसा टाळता येऊ शकतो याबाबत अत्...

रस्त्याचे बांधकाम मंजूर ठीकाणी न करता अन्य ठिकाणी केल्याने दोषींवर कार्यवाही करावे - माजी सभापती बेबी नरोटी.

इमेज
दिक्षा झाडे : - तालुका प्रतिनिधी, एटापल्ली एटापल्ली : - तालुक्यातील ग्रामीण मार्ग क्रमाक ८३ मोडके-वेटली गावाकडे जाणारा रस्त्याचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या १७ जुलै २०२० च्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. शासनाने मोडके-वटेली हे बांधकाम येथील नागरिकांना उत्तम रस्ता, परिवहन सुलभ व येणे-जाणे जलद व्हावे यासाठी मंजूर केले. परंतु येथील नागरिकांना पूर्वसूचना न देता किंवा त्यांची सहमती न घेता यांनी स्वमताने वरील उल्लेखित काम दुसरीकडे वटेली-डोदूर या मार्गावर केले. त्यामुळे सदर कामात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. तसेच सदर रस्त्याचे बांधकाम विनापरवानगीने अनियोजित जागेत झाले आहे.  तेव्हा सदर बांधकामाचे उच्चस्तरीय समिती नेमुन चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी माजी सभापती बेबी नरोटी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प, गडचिरोली व गट विकास अधिकारी पं.स, एटापल्ली यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यातील विद्यापीठ/ महाविद्यालय 15 फेब्रुवारीपासून सुरु.

इमेज
गडचिरोली : -  दि.10: जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली  दीपक सिंगला, यांनी शासन परिपत्रकच्या आधिन राहून शासन निर्देशाप्रमाणे कोविड - 19 साथरोग अंतर्गत गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये (कंटेनमेंट झोन वगळून) जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनातंर्गत येत असलेले  विद्यापीठ/महाविद्यालय चे वर्ग वसतीगृह दिनांक 15 फेब्रुवारी, 2021 पासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच वेळोवेळी निर्गमित झालेले कोविड विषयक शासन निर्णय व  मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे सर्व संबधितांना बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कळविले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची फ्लाइंग क्लबला भेट.

इमेज
गोंदिया : -  दि. 9: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बिरसी येथील  फ्लाइंग क्लबला  भेट देवून पाहणी केली.  अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात तुम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे. या संधीचे सोने करा, जशी भरारी आकाशात घेता तशी गगनभरारी सामाजाच्या सर्वांगिण विकासासाठी घेऊन  समाजाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशिल रहावे, असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी केले. प्रफुल्‍ल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया येथे फ्लांईग क्लब संस्थेची स्थापना करण्यात आली,  ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे श्री. कोश्यारी यांनी सांगितले.   यावेळी संस्थेचे संचालक अवतारसिंग यांनी राज्यपाल व श्री. पटेल यांना स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला. राज्यपालांनी प्रशिक्षणार्थी विमानात बसून पायलट प्रशिक्षणाचे निरिक्षण केले व तांत्रिक बाबी जाणून घेतल्या.   तत्पुर्वी सकाळी 11 वाजता बिरसी विमानतळ येथे  श्री. कोश्यारी  याचे आगमन झाले.  जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी राज्यपाल श्री.कोश्यारी  यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले़  ...

शेतकऱ्यांशी संबंधित योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी.

इमेज
मुंबई : -   दि.९ : शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा झाला तर शेती संदर्भात नियोजन करणे सोयीचे होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणि पेरणी हंगाम लक्षात घेऊन वेळेवर कर्जपुरवठा होणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे दिल्या.  नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय येथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सहकार विभाग आणि कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात संयुक्त बैठक घेतली. या बैठकीला सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम ,  कृषी सचिव एकनाथ डवले ,  सहकार आयुक्त अनिल कवडे ,  कृषी पणन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार , संचालक सतिश सोनी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून राज्यातील सर्व बाजार समितीच्या आवारात धान्य चाळण यंत्र बसविण्यात यावे ,  तसेच शेतमाल बाजार आवारात पाठविण्यापूर्वी गाव पातळीवर शेतमालाची आर्द्रता तपासण्यासाठी  विकास संस्थेच्या स्तरावर मॉश्चर मीटर उप...

महामानव श्री. संत रोहिदास महाराज यांची 644 व्या जयंती बाबत.

इमेज
गडचिरोली : -  दि.09: विभागीय  आयुक्त, नागपूर विभाग नागपूर यांना महामानव श्री. संत रोहिदास महाराज यांची 644 वी जयंती माद्य पौणिमा दिनांक 27 फेब्रुवारी , 2021 शनिवार रोजी सर्व शासकीय/ निमशायकीय कार्यालयात , ग्रामिण स्तरावर, ग्राम पंचायत, पोलीस ठाणे, प्राथमिक शाळा, अंगणवाडी आदी ठिकाणी साजरी करण्यात यावी.असे  तहसिलदार आस्थापना जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

जिल्हा स्तरावरील महिला दक्षता समिती सदस्य निवडीबबत.

इमेज
गडचिरोली : -  दि.09: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले शासकीय वसतिगृहे तसेच शासकीय निवासी शाळेतील मुलींचे लैगिंक शोषण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून महिला दक्षता समितीची स्थापना करावयाची आहे. सदर समितीची रचने मध्ये जिल्हा क्षेत्रीय अधिकारी (अध्यक्ष), वर्ग 2 किंवा वर्ग 3 महिला अधिकारी, कर्मचारी 1 (सदस्य सचिव), जिल्हयातील नामांकित महिला डॉक्टर एक (सदस्य), जिल्हयातील नामांकित महिला वकील (सदस्य), जिल्हयातील नामांकित निवृत्त महिला मुख्याध्यापीका (सदस्य), माजी विद्यार्थींनी ( उपलब्ध असल्यास )(सदस्य) यांचा समावेश असणार आहे.       सदर समितीमध्ये नमूद केल्याप्रमाणे जिल्हाक्षेत्रीय अधिकारी, जिल्हयातील महिला डॉक्टर , महिला वकील, निवृत्त महिला मुख्याध्यापीका, माजी विद्यार्थींनी इत्यादी नमुद केल्याप्रमाणे कार्य करण्यास इच्छुक असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण , गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधून नाव नोंदविण्यात यावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे. कार्यालयाचा पत्ता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली डॉ....

अहेरी तालुक्यातील 39 ग्राम पंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.

इमेज
अनिल आलाम- झिमेला ग्रामीण प्रतिनिधी  अहेरी : -  अहेरी तालुक्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या.आज अहेरी तालुक्यातील 39 ग्रामपंचायती साठी सरपंच पदासाठी तहसील कार्यालयात आरक्षण निश्चित करण्यात आले. तालुक्यातील 20 ग्रामपंचायती मध्ये अनुसूचित जमाती महिला सरपंच, तर 19 ग्रांप मध्ये सरपंच पद अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. तालुक्यातील अनुसूचित जमाती प्रवर्ग महिलांसाठी राखीव  ग्रामपंचायती :- 1) वट्रा खु 2) उमानूर 3) राजाराम 4) किष्टपूर दौड 5) तिमरम 6) वेडमपल्ली 7) रेगुलवाही 8) महागाव बु 9) महागाव खु 10) व्यंकटरावपेठा 11) चिंचगुंडी 12) इंदाराम 13) कोंजेड 14) पेरमिली 15) राजपूर पॅच 16) रेपनपल्ली 17) पल्ले 18) दामरंचा 19) खांदला 20) येरमणार अनुसूचित जमाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित ग्रामपंचायती : - 1)आलापल्ली 2) नागेपल्ली 3) आरेंदा 4) कमलापूर 5) कुरुमपल्ली 6) मांड्रा 7) देचली 8) पेठा 9) देवलमरी 10) बोरी 11) मेडपल्ली 12) मरपल्ली 13) गोविंदगाव 14) झिमलगट्टा 15) खमनचेरु 16) किस्टापुर वेल 17) वेलगुर 18) आवलमरी 19) वांगेपल्ली.

सचिवांचा वाढदिवस धानोऱ्यातील आदिवासी मुलींच्या निवासी शाळेत साजरा.

इमेज
ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे, संयमाने आणि निश्चयाने जगतात -डॉ.  दिलीप पांढरपट्टे गडचिरोली : -  दि.08:  ग्रामीण आदिवासी आपले जीवन शांतपणे, संयमाने आणि निश्चयाने जगतात म्हणून ते आजही खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात राहून सर्व जगाच्या पुढे आहेत असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी गडचिरोली येथे केले. यावेळी ते म्हणाले, गडचिरोली जिल्हयासारख्या भागात जावून आदिवासी विद्यार्थ्यांसोबत जन्मदिवस साजरा करण्याची आंतरिक इच्छा आज पूर्ण झाली आहे. धानोरा येथील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात आज झालेला जन्मदिनाचा कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय असून कोरोना नंतरच्या शाळेच्या सत्राला आजच्या कार्यक्रमाने सुरुवात होत आहे याचा आनंद आहे. दुर्गम भागात ऊन, वारा, पाऊस तसेच  कोरोना न बघता विद्यादान येथील शिक्षकांनी सुरू ठेवल्याचे मला मनस्वी समाधान असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी केले. माहिती व जनसंपर्क विभागाच्या अधीनस्त असलेल्या कार्यालयांच्या आढाव्यासाठी विदर्भ दौऱ्यावर आलेल्या  महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी आ...

राज्यात दहा ठिकाणी ईएसआय रुग्णालयांसाठी एमआयडीसी देणार भूखंड.

इमेज
मुंबई : -  दि. 4 : औद्योगिक वसाहतीमधील कामगारांना आरोग्यविषयक सोयी-सुविधा मिळाव्यात म्हणून  ईएसआय रुग्णालये उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे १० ठिकाणी भूखंड उपलब्ध  करून देण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ३८८ वी बैठक महामंडळाचे अध्यक्ष तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री आतिथीगृह येथे झाली. राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासोबत रोजगार निर्मिती व कामगारांना दिलासा देणाऱ्या अनेक विषयांना यावेळी मंजुरी देण्यात आली. बैठकीला उद्योग राज्यमंत्री कु.आदिती तटकरे, उद्योग विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे सीईओ डॉ. पी. अन्बलगन व अधिकारी उपस्थित होते. औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांना आरोग्यविषयक सेवा-सुविधा पुरविण्याचे काम इएसआयच्या रुग्णलयामार्फत करण्यात येते. रुग्णालय उभारण्यासाठी मागणीप्रमाणे औद्योगिक क्षेत्रामध्ये भूखंड उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. यामध्ये सिन्नर, तळोजा, पालघर, जळगाव, औरंगाबाद, रायगड, रोहा, चाकण तसेच सातारा व ...