ग्राम पंचायत-बुर्गी येथे १५ वर्षा नंतर नाविस समर्पित भाजपाचे उमेदवार श्री विलास गावडे यांचे सरपंच खुर्चीवर विराजमान.
एटापल्ली : - ग्राम पंचायत-बुर्गी येथे माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृत्वाखाली दि : - २६/०२/२०२१ रोजी ग्राम पंचायत कार्यालय-बुर्गी येथे १५ वर्षानंतर नाविस समर्पित भाजपाचे नवनिर्वाचित सरपंच श्री विलास गावडे हे सरपंच खुर्ची वर विराजमान झाले आहेत. नवनिर्वाचित सरपंच श्री विलास गावडे यांची सर्व जनते समोर शपथविधी पार पाडण्यात आली.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अनुसूचित जमाती मोर्चा भाजपा गडचिरोली तथा सरपंच श्री प्रशांत आत्राम, ग्राम पंचायत तोडसा, माजी सरपंच रैनेंंद्र येमला ग्राम पंचायत तुमरगुंडा, उसण्णा मेडीवार सामाजिक कार्यकर्ता व ग्राम पंचायत सदस्य गणेश गावडे, उमेश गावडे, कल्पना तलांडे, प्रिती कालंगा, तसेच गावातील नागरिक रमेश गावडे, कुमार सुरेंद्र व इतर मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा