जिल्हा स्तरावरील महिला दक्षता समिती सदस्य निवडीबबत.

गडचिरोली : - दि.09: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेले शासकीय वसतिगृहे तसेच शासकीय निवासी शाळेतील मुलींचे लैगिंक शोषण होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून महिला दक्षता समितीची स्थापना करावयाची आहे. सदर समितीची रचने मध्ये जिल्हा क्षेत्रीय अधिकारी (अध्यक्ष), वर्ग 2 किंवा वर्ग 3 महिला अधिकारी, कर्मचारी 1 (सदस्य सचिव), जिल्हयातील नामांकित महिला डॉक्टर एक (सदस्य), जिल्हयातील नामांकित महिला वकील (सदस्य), जिल्हयातील नामांकित निवृत्त महिला मुख्याध्यापीका (सदस्य), माजी विद्यार्थींनी ( उपलब्ध असल्यास )(सदस्य) यांचा समावेश असणार आहे. 
    
सदर समितीमध्ये नमूद केल्याप्रमाणे जिल्हाक्षेत्रीय अधिकारी, जिल्हयातील महिला डॉक्टर , महिला वकील, निवृत्त महिला मुख्याध्यापीका, माजी विद्यार्थींनी इत्यादी नमुद केल्याप्रमाणे कार्य करण्यास इच्छुक असल्यास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण , गडचिरोली या कार्यालयाशी संपर्क साधून नाव नोंदविण्यात यावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे. कार्यालयाचा पत्ता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आयटीआय रोड, कॉम्पलेक्स, गडचिरोली व दुरध्वनी क्रमांक 07132 222192 आहे असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.