आर. आर. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली.

मुंबई : - दि. 16 : ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ आणि ‘तंटामुक्त गाव अभियाना’च्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा-मोहरा बदलणारे, ‘आधुनिक गाडगेबाबा’ असा ज्यांचा गौरवपूर्ण उल्लेख होतो ते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, दिवंगत आर. आर. पाटील उर्फ आबांचा आज स्मृतीदिन. लोककल्याणकारी निर्णयाने राज्यातल्या घराघरात पोहचलेल्या या लोकप्रिय नेतृत्वाला, महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाला त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 

राज्यात डान्सबार बंदी, गुटखाबंदीच्या निर्णयांची यशस्वी अंमलबजावणी, भ्रष्टाचारमुक्त पोलिस भरतीच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना पोलिस दलाची दारे खुली करणारे आर.आर.आबा त्यांच्या क्रांतिकारी निर्णयांसाठी राज्यातील जनतेच्या कायम स्मरणात राहतील.” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.