राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची फ्लाइंग क्लबला भेट.

गोंदिया : - दि. 9: राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी बिरसी येथील  फ्लाइंग क्लबला  भेट देवून पाहणी केली. 

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात तुम्हाला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे. या संधीचे सोने करा, जशी भरारी आकाशात घेता तशी गगनभरारी सामाजाच्या सर्वांगिण विकासासाठी घेऊन  समाजाचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशिल रहावे, असे आवाहन श्री. कोश्यारी यांनी केले. प्रफुल्‍ल पटेल यांच्या पुढाकाराने गोंदिया येथे फ्लांईग क्लब संस्थेची स्थापना करण्यात आली,  ही बाब जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असल्याचे श्री. कोश्यारी यांनी सांगितले.  

यावेळी संस्थेचे संचालक अवतारसिंग यांनी राज्यपाल व श्री. पटेल यांना स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला. राज्यपालांनी प्रशिक्षणार्थी विमानात बसून पायलट प्रशिक्षणाचे निरिक्षण केले व तांत्रिक बाबी जाणून घेतल्या.  

तत्पुर्वी सकाळी 11 वाजता बिरसी विमानतळ येथे  श्री. कोश्यारी  याचे आगमन झाले.  जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी राज्यपाल श्री.कोश्यारी  यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले़ 

खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे, जिल्हा पोलीस अधिक्षक विश्व पानसरे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, माजी खासदार मधुकर कुकडे,  गोंदियाचे नगराध्यक्ष अशोक इंगळे विमानतळावर उपस्थित होते. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.