गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप योजना.

गडचिरोली : - दि.18: गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल वाटप करणे या योजनेअंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदान तत्वावर पत्र्याचे स्टॉल व रु. 500/- इतक रोख अनुदान देणे . या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे आहेत.
       
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी व अनुसूचित जातीचा असावा. व गटई कामगार असावा, अर्जदाराच्या कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामीण भागात रु. 40,000/- व शहरी भागात रु.50,000/- पेक्षा अधिक नसावे .(यासाठी तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहील) , अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे, अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत , नगरपालीका, छावणी बोर्ड, (कॅन्टॉन्मेंट बोर्ड ) किंवा महानगरपालीका यांनी त्यास भाडयाने,कराराने, खरेदीने अगर मोफत परंतू अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वमालकीची असावी. 
      
अधिक माहितीकरीता व अर्जाकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण गडचिरोली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन गडचिरोली कार्यालयाशी संपर्क करण्यात यावा. असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

नगरपंचायत कार्यालय मध्ये दबाव निर्माण करणारे अवैध बोर्ड हटवा.भाकपाकडून गुन्हा दाखल करण्याचा इशारा.