मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यातील विद्यापीठ/ महाविद्यालय 15 फेब्रुवारीपासून सुरु.
गडचिरोली : - दि.10: जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली दीपक सिंगला, यांनी शासन परिपत्रकच्या आधिन राहून शासन निर्देशाप्रमाणे कोविड - 19 साथरोग अंतर्गत गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये (कंटेनमेंट झोन वगळून) जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनातंर्गत येत असलेले विद्यापीठ/महाविद्यालय चे वर्ग वसतीगृह दिनांक 15 फेब्रुवारी, 2021 पासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तसेच वेळोवेळी निर्गमित झालेले कोविड विषयक शासन निर्णय व मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे सर्व संबधितांना बंधनकारक असेल, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा