जात प्रमाणपत्र पडताळणी करीता ऑनलाईनवेबीनारचे (Webinar) आयोजन.

गडचिरोली : - दि.26: जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिये संदर्भात गडचिरोली जिल्हयातील उमेदवारांना माहिती व्हावी करीता सदरचे ऑनलाईन वेबीनारचे (Webinar) बाबत जनजागृती व्हावी, जेणेकरुन सर्वसामान्य लोकापर्यत जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतची माहिती उदा. अर्ज कोणत्या प्रकारे भरावे, कोणत्या प्रकारचे दस्ताऐवज जोडावे, इ. मिळावी व अर्जदारास अर्ज सादर करताना ऑनलाईन सुविधेचा अचुकपणे /प्रभावीपणे वापर करणे शक्य होईल. 
       
त्यानुषंगाने समितीस्तरावर ऑनलाईन वेबीनारचे  (Webinar) आयोजन गुरुवार, दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आले होते.  परंतु गडचिरोली जिल्ह्यात या वेबीनार मध्ये मोठया प्रमाणात उमेदवारांकडून प्रतिसाद मिळालेला नाही म्हणून पुनश्च ऑनलाईन वेबीनारचे आयोजन गुरुवार, दि.04 मार्च 2021 रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आलेले आहे.         

वेबीनारचे (Webinar) लींक पुढील प्रमाणे आहे. https://meet.google.com/iyd-sryu-pst  असा आहे, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राजेश पांडे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.