रस्त्याचे बांधकाम मंजूर ठीकाणी न करता अन्य ठिकाणी केल्याने दोषींवर कार्यवाही करावे - माजी सभापती बेबी नरोटी.

दिक्षा झाडे : - तालुका प्रतिनिधी, एटापल्ली

एटापल्ली : - तालुक्यातील ग्रामीण मार्ग क्रमाक ८३ मोडके-वेटली गावाकडे जाणारा रस्त्याचे बांधकाम जिल्हा परिषदेच्या १७ जुलै २०२० च्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली आहे. शासनाने मोडके-वटेली हे बांधकाम येथील नागरिकांना उत्तम रस्ता, परिवहन सुलभ व येणे-जाणे जलद व्हावे यासाठी मंजूर केले. परंतु येथील नागरिकांना पूर्वसूचना न देता किंवा त्यांची सहमती न घेता यांनी स्वमताने वरील उल्लेखित काम दुसरीकडे वटेली-डोदूर या मार्गावर केले. त्यामुळे सदर कामात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे. तसेच सदर रस्त्याचे बांधकाम विनापरवानगीने अनियोजित जागेत झाले आहे. 

तेव्हा सदर बांधकामाचे उच्चस्तरीय समिती नेमुन चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अशी मागणी माजी सभापती बेबी नरोटी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प, गडचिरोली व गट विकास अधिकारी पं.स, एटापल्ली यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.