एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) मुळे शहरांचा विकास आणि घरे स्वस्त होतील.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नगरपरिषद व नगरपंचायत आढावा बैठकीत प्रतिपादन. गडचिरोली : - दि.31: जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगर विकास मंत्री महाराष्ट्र राज्य ना.एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची आढावा बैठक काल जिल्हा नियोजन सभागृहात घेतली. यावेळी संपूर्ण राज्यात ऐतिहासिक निर्णय घेऊन लागू करण्यात आलेल्या एकत्रित विकास नियंत्रण नियमावली (युनिफाईड डीसीआर) चे सादरीकरण झाले. यावेळी पालकमंत्री बोलताना म्हणाले, या एकत्रित विकास विकास नियंत्रण नियमावलीमूळे सर्व शहरांचा विकास सारख्या पद्धतीने होण्यास चालना मिळेल व यामुळे सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरे स्वस्त होतील. गेल्या अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित होता. गडचिरोली मध्ये यावेळी माहिती देण्यासाठी व उपस्थितांच्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतः प्रधान सचिव, नगर विकास महेश पाठक पालकमंत्री यांचे समवेत आले होते. या नवीन नियमावली मुळे एफएसआइचा गैरवापर आहे तो थांबेल, मोठ्या प्रमाणावर एफएसआइ दिल्यामुळे हौसिन्ग स्टॉक मोठ्या प्रमाणावर निर्माण होईल. घरांच्या किमती नियंत्रणात येतील, परवडणारी घरे ...