वेळोवेळी सुरू केलेल्या व प्रतिबंधित बाबींसाठी 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढ जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांचे आदेश.

गडचिरोली : - दि.06: शासन निर्देशाप्रमाणे कोविड-१९ साथरोग अंतर्गत मिशन बिगीन अंतर्गत वेळोवेळी सुरू केलेल्या व प्रतिबंधित बाबींना जिल्हा गडचिरोली सीमा क्षेत्रात 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या बाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यापुर्वी ज्या बाबींना सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती त्या सुरूच राहतील मात्र ज्या बाबींना परवानगी देण्यात आली नाही त्या बाबी या आदेशान्वये 31 जानेवारी 2021 पर्यंत बंदच राहतील असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच प्रशासनाकडून कोरोना संसर्गाबाबत खबरदारीच्या उपाय योजनांबाबत वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असणार आहे. 

यात्रा, जत्रा भरविण्यासाठी परवानगी आवश्यक : जिल्हयात कोणत्याही गावात यात्रा जत्रा भरविण्यासाठी प्रशासनाची पुर्व परवानगी आश्यक असल्याचे सदर आदेशामध्ये नमुद करण्यात आले आहे. येत्या वर्षात कोणत्या गावात कधी यात्रा आहेत तसेच त्याबाबतची माहिती प्रशासनाकडून एकत्रित करण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक गावातील विविध यात्रा जत्रा यासाठी विहित पध्दतीने प्रशासनाकडून परवानगी घेणे आता प्रत्येकासाठी आवश्यक असणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.