मुल येथील फूटपाथवर व्यवसाय करणाऱ्यांना अतिक्रमण हटविण्या अगोदर व्यवसाय करण्याकरिता पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात यावे.

चंद्रपूर/मुल : - मागील एक वर्षापासून कोरोना महामारी काळ सुरू आहे. यामुळे छोटे व मोठे उद्योगधंदे बंद असल्यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या व्यावसायिकांचा हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचा फुटपाथ हाच एक मात्र मार्ग आहे. 
नगरपरिषद अंतर्गत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. परंतु अतिक्रमण हटविण्या अगोदर फुटपाथ व्यवसायिकांच्या दुकानांसाठी जागेची पर्यायी व्यवस्था करून देण्यात यावे. जेणेकरून त्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार नाही. 

या करिता नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना निखिल वाढई, प्रणित पाल,आकाश येसनकर, रोहित शेंडे, सोहन दहिलकर, हर्षल भूरसे, साहिल खोब्रागडे, गोलू कामळी,अक्षय दुमावार,करण डोरलीकर, तथा अन्य युवा वर्ग उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.