नारी शक्ती पुरस्कारांसाठी ऑनलाईन अर्ज आंमत्रित
गडचिरोली : - दि.29: केंद्रीय महिला व बाल विकास विभाग, अंतर्गत महिला व बाल विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था/व्यक्ती यांना नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुकांना केंद्र शासनाच्या www.wcd.nic.in या वेबसाईटवर जावून नारी शक्ती पुरस्कार मार्गदर्शीका नुसार त्यात आवश्यक पात्रता, नामांकन कोण सादर करु शकतील, आवश्यक कागदपत्रे, नामांकन सादर करण्याची पध्दत, वयाची अट, अनुभव याचे वाचन करुन www.narishaktipurskar.wcd.gov.in या ऑनलाईन लिंक द्वारे केवळ ऑनलाईन अर्ज/नामनिर्देशन भरण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2021 पर्यंत आहे.
तरी इच्छुक व्यक्ती /संस्थाकडुन केवळ ऑनलाईन अर्ज/नामनिर्देशन मागविण्यात येत आहे. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा