जिल्ह्यातील ग्रामपंचायात मतदान सरासरी 80 टक्के, दुसऱ्या टप्प्यातील सहा तालुक्यातील अंतिम मतदान टक्केवारी 78.08 टक्के.

दोन्ही टप्प्यातील निवडणूकीची उद्या मतमोजणी
गडचिरोली : - दि.21 : दि. 20 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 6 तालुक्यातील अंतिम मतदान टक्केवारी 78.08 टक्के नोंदविले गेली. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सहा तालुक्यातील प्रत्यक्ष मतदान झालेल्या 150 ग्रामपंचायतींमध्ये  78.08 टक्के मतदान झाले आहे. या मतदानात चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, एटापल्ली, भामरागड व सिरोंचा या तालुक्यातील 150 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणूका झाल्या.

जिल्हयातील सहा तालुक्यांमधील 150 ग्रामपंचायतीमधील अंतिम आकडेवारी
चामोर्शी 65 ग्रामपंचायती – 82.23 टक्के (एकुण- 101914- पु.43540 स्त्री.40266)
मुलचेरा 14 ग्रामपंचायती – 80.41 टक्के (एकुण-31627 - पु.13109 स्त्री.12321)
अहेरी 28 ग्रामपंचायती – 73.75 टक्के (एकुण-53691- पु.20381 स्त्री.19215)
एटापल्ली 14 ग्रामपंचायती – 64.95 टक्के (एकुण-21939- पु.7869 स्त्री.6381)
भामरागड 2 ग्रामपंचायती – 53.79 टक्के (एकुण- 2324- पु.730 स्त्री.520)
सिरोंचा 27 ग्रामपंचायती – 80.48 टक्के (एकुण-33907- पु.14133 स्त्री.13154)
एकुण 150 ग्रामपंचायती – 78.08 टक्के (एकुण-191619- पु.99762 स्त्री.91857)

बारा तालुक्यातील अंदाजित मतदान 80 टक्के : दि. 15 जानेवारी 2021 व दि. 20 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातील  मतदान 80 टक्के नोंदविले गेले. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे बारा तालुक्यातील प्रत्यक्ष मतदान झालेल्या 320 ग्रामपंचायतींमध्ये  80 टक्के मतदान झाले आहे.  या मतदानात बारा तालुक्यातील 320 ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष निवडणूका झाल्या.

जिल्हयातील बारा तालुक्यांमधील 320 ग्रामपंचायतीमधील अंदाजित अंतिम आकडेवारी
एकुण 320 ग्रामपंचायती – 80 टक्के (एकुण-476774- पु.196940 स्त्री.184546)
बारा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणी 22 जानेवारीला होणार : दि.15 जानेवारी 2021 व दि. 20 जानेवारी 2021 रोजी घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यात शुक्रवार, दि.22 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून सुरुवात होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया 12 तालुक्याच्या ठिकाणी होणार असून ते पुढीलप्रमाणे आहे.

मतमोजणी  शुक्रवार, दि.22 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून व मतमोजणीचे स्थळ:
कोरची - तहसिल कार्यालय, कोरची (सभागृह), 
कुरखेडा- तहसिल कार्यालय, कुरखेडा, 
देसाईगंज- तहसिल कार्यालय, देसाईगंज (इमारतीचा आतील परिसरात), 
आरमोरी- नविन प्रशासकीय भवन, आरमोरी, खोली क्र.210, 
गडचिरोली- क्रिडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड, गडचिरोली, 
धानोरा- महसुल मंडळ, (आतील पटांगण) येथे धानोरा, 
चामोर्शी- केवळरामली हरडे महाविद्यालय मुल रोड, चामोर्शी , 
मुलचेरा- तहसिल कार्यालय मुलेचरा येथील सभागृहात, 
अहेरी- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागेपल्ली, 
एटापल्ली- महसुल मंडळ एटापल्ली (आतील परीसर ), 
भामरागड- तहसिल कार्यालय, भामरागड (नाझर कक्ष), 
सिरोंचा- महसुल मंडळ सिरोंचा (खुल्या आवारात व सभागृहात).

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.