प्रतिबंधीत थाई मागुर माश्याचे प्रजनन, उत्पादन, किंवा विक्री करणाऱ्यांवर होणार कार्यवाही- सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे आवाहन.
गडचिरोली : - दि.05: मा.हरित लवाद, नवी दिल्ली येते मागुर माश्याबाबत, ओरिजिनल अँप्लिकेशन no.381ऑफ 2018 याचिकेच्या दिनांक 22 जानेवारी 2019 रोजीच्या पारित केलेल्या आदेशानुसार मा. राष्ट्रीयहरित लवाद, नवी दिल्ली यांनी मागूर माश्याच्या प्रजनन, मत्स्यपालन, वाहतूक व विक्री करण्यवार बंदी घातली आहे.
प्रतिबंधीत थाई मागूर (Clarias gariepenius) हा वाघूर, मगर, मागुरी या नावानेही ओळखला जातो. हा मासा पूर्णतः मांसाहारी असुन पाण्यातील नैसर्गिक परिसंस्था व जैवविवीदतांसाठी अत्यंत घातक आहे. हायब्रीड मागूर माश्याच्या खाद्य पद्धतीमुळे हा मासा नैसर्गिक परिसंस्था मध्ये असलेल्या इतर स्वदेशी माश्यांकरिता हानिकारक ठरत आहे. हा मासा अनाधिकृतरित्या भारतात दाखल करण्यात आला. आणि अनेक शास्त्रीय अभ्यासातुन अशे निदर्शनास आलेले आहे की विदेशी मागूर माश्याचे सेवन हे शरीरासाठी अयोग्य व रोग निर्मीतीला प्रेरित करु शकते व यामुळे कॅन्सर सारखे गंभीर रोग सुध्दा निर्माण होऊ शकतात.
विदेशी थाई मागूर वर बंदी का ? हा मासा पुर्णता मांसाहारी असल्याने जलिय पर्यावरणाकरिता अत्यंत धोकादायक आहे. हा मासा हवेतून प्राण वायु घेवुन श्वसन करत असल्यामुळे मोठया प्रमाणात व अतिशय प्रतिकुल परिस्थितीत सुध्दा वाढु शकतो. तसेच अगदी चिखलातही हा मासा जिंवत राहुण वाढू शकतो. थाई मागूर प्रामुख्याने इतर मासे, पाण्याजवळ येणारे लहानपक्षी, प्राण्याचे सडलेले मांस, पाण्याच्या तळाशी साचलेला जैविक कचरा, मानवी विष्टा, इत्यादी न मिळाल्यास अजैविक कचरा इत्यादी सुद्धा खाद्य मनून स्वीकार करतो. यामुळे इतर मासे, तसेच जालीय परिसंस्था मधील इतर घटकांच्या अस्तीत्वा करीता हानिकारक ठरतो व इतर प्रजातीच्या लुप्त होण्यास कारणीभूत समजल्या जाते. या माशांचे मत्स्यसंवर्धन करताना कमी खर्चात अधीक उत्पादन मिळण्यासाठी माश्याला कोंबडयांची घाण, खाण्या योग्य नसलेले कोंबडीचे मांस तसेच कत्तल खान्यातील कुजलेले शेळी/मेंढी गाई म्हशी यांचे मांस खादय म्हणुन वापरले जाते. यामुळे पर्यावरणाचे प्रदुषण होत असल्याचे आढळून येते. सदर माश्याच्या मासांत अनेकदा हेवी मेटल धातु जसे zinc, cadmium, arsenic इत्यादीचे संक्रमण सूध्दा आढळून आलेले आहे. हे धातु मानवी शरीरा साठी अत्यंत हाणीकारक आहे.
वरील कारणे लक्षात घेता मागुर मांसा संवर्धन करण्यावर प्रतिबंद घालण्यात आले आहे. या अनुषंगाने जिल्हयातील सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येते की विदेशी थाई मागुर माश्याचे प्रजनन, उत्पादन संवर्धन किंवा विक्री हे प्रतिबंधीत आहे. विदेशी थाई मागुर माश्याचे प्रजनन, उत्पादन संवर्धन किंवा विक्री करतांनी आढळून आल्यास या बाबत शासनाच्या नियमानुसार कठोर कार्यवाही करण्यात येईल. असे सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय गडचिरोली श्री प्रशान्त वैद्य यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा