शासनाने प्रदान केलेल्या भूखंडावरील कामाबाबत तपासणी करुन कार्यवाही करावी- विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले.
मुंबई : - दि. ७ : चेंबुर स.नं.१४ ठक्कर बाप्पा कॉलनी येथील कस्तुरबा सोसायटीच्या प्लॉट डेव्हलपमेंटच्या कामाबाबत तपासणी करुन नियमानुसार कार्यवाही करावी तसेच दोषींविरोधात फसवणुकीसंदर्भात तक्रार दाखल करावी. असे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले यांनी दिले.
कस्तुरबा सोसायटीच्या प्लॉट डेव्हलपमेंटचे कामासंदर्भात विधानभवन येथे बैठक झाली. यावेळी कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.अण्णासाहेब मिसाळ, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर, महसूल विभागाचे सह सचिव श्री.रमेश चव्हाण तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मौजे चेंबुर स.नं.१४ ठक्कर बाप्पा कॉलनी येथील शासनाने प्रदान केलेल्या जमिनीवर कस्तुरबा नगर गृहनिर्माण संस्थेला ३ इमारतींचे बांधकाम करुन ७२ सभासदांना निवासाची व्यवस्था करण्यासाठी शासनाने संस्थेस जमिनीचा ताबा दिला होता. याबाबतचा करारनामा संस्थेने दि. १७ ऑक्टोबर, १९७७ रोजी केला होता. परंतु, संस्थेने अटी व शर्तीचा भंग केल्यामुळे शासनाने जमीन संस्थेकडून काढून घेतली व या अटी शर्ती ६ महिन्यांत नियमानुसार करुन घेण्याबाबत आदेशित करण्यात आले होते. परंतु आदेशाविरुध्द संस्थेने न्यायालयात अपील दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाने दि. १३ मार्च, २०१८ रोजी अंतिम आदेश पारीत करुन संस्थेची याचिका फेटाळून लावली, अशी माहिती यावेळी नमूद करण्यात आली. या शासकीय जमिनीसंदर्भात कायदेशिररित्या तपासणी करुन योग्य ती कारवाई करावी, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष, श्री.नाना पटोले यांनी दिल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा