महाडिबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीकरीता लवकरात लवकर अर्ज सादर करण्याबाबत.

गडचिरोली : - दि.06: समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती /शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क व सर्व शिष्यवृत्ती योजने अंतर्गत अनु.जाती, इमाव विमाप्र व विजाभज प्रवर्गातील शैक्षणिक सत्र 2020-21 मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांकडुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर नवीन फ्रेश/ नुतनीकरण अर्ज नोंदणी व सादरीकरणाची प्रक्रिया तसेच सन 2019-20 या शैक्षणिक सत्रातील प्रलंबित विद्यार्थ्यांकरीता पुनश्च (रि-अप्लाय) अर्ज करण्याकरीता दिनांक 03 डिसेंबर 2020 पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणाली सुरु झालेली आहे. महाविद्यालयांने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करुन घ्यावी. महाडिबीटी प्रणालीवर मार्गदर्शक तत्वे व अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेचे नियम यासाठी सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी अधिक सविस्तर माहितीसाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्यावी. https://mahadbtmahait.gov.in/Home/Index               

सदर योजनेच्या अटी व शर्ती शासन निर्णयानुसार लागु राहील. दिनाक 03 डिसेंबर 2020 पासुन महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी सुरु झाली असुन जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.