कृषि निविष्ठा वितरकांची बैठक व प्रशिक्षण संपन्न 3.1 वर्जन अपडेट न केलेल्या विक्रेत्यांचे आय. डी. रद्द होणार.

गडचिरोली : - दि.29: गडचिरोली जिल्ह्यातील कृषि निविष्ठा वितरकांची बैठक व प्रशिक्षण श्री.डी.एम. कोळप कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे अध्येक्षतेखाली कृषि विकास अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद, गडचिरोली येथे दिनांक 28 जानेवारी 2021 रोजी पार पडली. या बैठकीसाठी जिल्हा परिषद गडचिरोलीचे जिल्हा कृषि अधिकारी श्री. पी.झेड.तुमसरे, मोहिम अधिकारी श्री. के. जी. दोनाडकर, इफको कंपनीचे विक्री अधिकारी रितेश मलगार तसेच जिल्ह्यातील सर्व रासायनिक खते घाऊक विक्रेते उपस्थित होते.
          
बैठकीमध्ये प्रत्यक्ष खत साठा आणि ई पॉस मशिनचे खत साठा सारखा करणे. ई पॉस मशिनचे 3.1 वर्जन अपडेट करणे. जास्तीत जास्त खत विक्रेत्यांकडे डेस्कटॉप व मोबाईल वर्जन सुरु करून देणे. खत विक्रेत्यांकडील प्रलंबित Acknowledgement निकाली काढणे. Biometric मशिन वितरीत करणे. सर्व 100% खत विक्रेत्यांनी डिजिटल पेमेंट सुविधा QR CODE उपलब्ध करून देणे. कार्यरत नसलेल्या खत विक्रेत्यांची MFMS नोंदणी रद्द करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच जे विक्रेते ई पॉस मशिनचे 3.1 वर्जन 31/1/2021 पर्यंत अपडेट करणार नाहीत. त्या विक्रेत्यांचे आय. डी. रद्द करण्यात येतील. अशा सूचना कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद, गडचिरोली श्री. डी.एम. कोळप यांनी दिल्या. येत्या खरीप हंगाम 2021 च्या पूर्व तयारी बाबत चर्चा करण्यात आली यामध्ये खते, बियाणे, कीटकनाशके यांची मागणी, पुरवठा वाहतूक व वाटप यांचे नियोजन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक व आभार मोहिम अधिकारी श्री. के. जी. दोनाडकर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.