भामरागड येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा.

भामरागड : - ता.०६- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तालुका भामरागडतर्फे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जयंती निमित्त पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
             
०६ जानेवारी २०२१ ला स्थानिक पत्रकार भवन येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भामरागड तालुका अध्यक्ष ईश्वर परसलवार यांचे हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व द्विप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी श्रीकांत मोडक, लीलाधर कसारे, राजेन्द्र कोठारे,मनिष येमुलवार, गोविंद चक्रवर्ती, प्रदिप कर्मकार, महेन्द्र कोठारे, अविनाश नारनवरे इत्यादी पत्रकार बांधव उपस्थित होते.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करून मान्यवरांनी त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.न्याहारीनंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.