31 जानेवारीला पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ.
गडचिरोली : - दि.27: 31 जानेवारी 2021 रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत जिल्हयात असणारे प्रत्येक पात्र बालकास पोलिओ डोस दिले जातील याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली असून याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे असे सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद म्हशाखेत्री यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना डॉ. विनोद म्हशाखेत्री यांनी सांगितले की, ट्रान्झीट टीम म्हणजे जीथे बसेस, रेल्वे असे ठिकाण आहेत ज्याठिकाणी त्यांचे थांबे असतील तीथे पल्स पोलीओची लस पाजण्यात येणार आहे. तसेच मोबाईल टीमद्वारे ग्रामीण तसेच दुर्गम भागात पल्स पोलीओची लस लहान बालकांना पाजण्यात येणार आहे.
चालु वर्षात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे विशेष सत्र राबविण्यात येत असून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अतंर्गत दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील 0-5 वर्ष वयोगटातील 89710 अपेक्षित लाभार्थी आहेत. याकरीता ग्रामीण भागात 2093 व शहरी भागात 46 असे एकूण 2142 लसीकरण बुथ आहेत. आवश्यक पोलिओ मात्रा ग्रामीण व शहरी मिळूण 116527 लस मात्रा उपलब्ध आहे. तसेच पल्स पोलिओ मोहिमेकरीता एकूण 6479 मनुष्यबळ उपलब्ध असून त्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. तसेच डॉ. समीर बनसोडे यांनीही पल्स पोलिओ बाबत माहिती उपस्थितांना सांगितली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा