उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन.

गडचिरोली : - दि.27: 32 वे रस्ता सुरक्षा अभियान, दि. 18 जानेवारी 2021 ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली तसेच पोलीस विभाग (वाहतुक शाखा), गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दि. 28 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 4.00 ते 6.00 च्या कालावधीत अप्पलवार आय हॉस्पीटल, गडचिरोली येथे टॅक्सी चालक तसेच ऑटोरिक्षा चालकांकरीता मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केलेले आहे.

तथापि गडचिरोली जिल्ह्यातील सर्व टॅक्सी चालक तसेच ऑटोरिक्षा चालकांनी या मोफत नेत्र तपासणी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली तसेच पोलीस विभाग (वाहतुक शाखा), गडचिरोली यांचे वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.