ग्राम विकासाची कामे तातडीने मार्गी लावावी - राज्यमंत्री अब्दुल सत्तार.

मुंबई : - दि. 6 : औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला प्रशासकीय मान्यता,  ग्रामीण भागातील  विकास कामे, ग्रामविकास  विभागातर्फे देण्यात येणारे पुरस्कार यावर तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.  

ग्रामविकास विभागाच्या बांधकाम भवन येथे घेतलेल्या आढावा बैठकीत श्री.सत्तार बोलत होते. यावेळी ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव, उपसचिव प्रदीप जैन, उपसचिव  ए. के. गागरे,  उपसचिव माली, अवर सचिव चांदेकर, अवर सचिव सावणे, आदी उपस्थित होते.

यावेळी विविध विकास कामासंदर्भात आढावा घेण्यात आला. बैठकीत औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला  प्रशासकीय मान्यता देणे तसेच ग्रामविकास विभागातर्फे देण्यात येणाऱ्या यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार, आदर्श ग्रामसेवक- ग्रामविस्तार अधिकारी पुरस्कार, आर. आर. आबा पाटील सुंदर ग्राम पुरस्कार, राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार, क्षेत्रीय गुणवंत अधिकरी- कर्मचारी पुरस्कारा संदर्भात चर्चा करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.