दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंती संपन्न.
गडचिरोली : - दि.06: जिल्हा पत्रकार संघ, गडचिरोलीच्या वतीने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार कांतीभाई सूचक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुकुंद जोशी, केशवराव दशमुखे, नरेंद्र माहेश्वरी, हर्षद निमजे, जिल्हा माहिती कार्यालयातील महादेव बसेना यांची मंचावर उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात कु. करिष्मा नरेंद्र माहेश्वरी हिचा सत्कार करण्यात आला. कु.करिष्मा माहेश्वरी या दिव्यांग विद्यार्थिनींने राज्यातील सर्वात उंच असलेले कळसुबाई शिखर सर करुन नावलौकीक केला आहे. या कामगिरीबद्दल गडचिरोली जिल्हा पत्रकार संघाकडून तिचा सत्कार करण्यात आला आहे. तसेच हर्ष अमित सुचक यांनी शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकविल्यामुळे यावेळी हयाचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विक्टोरिया ॲकाडमी चे संचालक हर्षद निमजे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार कांतीभाई सूचक, गणपत वणीकर, नरेंद्र माहेश्वरी, सेवानिवृत्त मुख्याधापक तसेच पत्रकार मुनिश्वर बोरकर यांचेही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी कांतीभाई सुचक यांनी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिवनावर प्रकाश टाकला व जिल्हा पत्रकार संघ समस्या शासन दरबारी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार असे सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन मुनिश्वर बोरकर तर आभार श्रीमती रेखा वंजारी यांनी मानले. कार्यक्रमास अनूप मेश्राम, प्रकाश सोरते, मुकेश गेडाम, श्रीमती संगीता विजयकर, अनिल राऊत, आनंद मांडवे, अनिल बोदलकर, जिल्हा माहिती कार्यालयातील मनोहर बेले, दिनेशकुमार वरखेडे, विलास मेटे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा