पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पिपली बुर्गी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री रंजीतभाऊ लेकामी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.

इमेज
एटापल्ली:- आज दि. २८/०२/२०२२ ला पिपली बुर्गी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री रंजीतभाऊ लेकामी यांचा तालुका प्रमुख श्री मनिष दुर्गे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश झाले.  यावेळी शिवसेना शहर प्रमुख श्री राहुल भाऊ आदे, शिवसेना विभाग प्रमुख श्री सलीम शेख, युवसेना तालुका प्रमुख श्री अक्षय भाऊ पुंगाटी, युवासेना शहर प्रमुख श्री सुमित खन्ना, श्री शांतनु उइके, श्री हर्षद शेख, श्री सुजल दुर्गे, श्री मोहित दुर्गे, श्री अंकित मांडवकर, श्री विवेक ओडपल्लीवार, श्री सुजल वाघमारे, श्री पवन चित्तलवार, श्री दादू कुर्मावार, तसेच समस्त युवा सेना व शिवसेना पधाधिकारी उपस्थित होते. त्या प्रसंगी श्री रंजीत भाऊ लेकामी यांची पिपली बुर्गी शाखा प्रमुख पदी निवड करण्यात आली.

कवटाराम- कापेवंचा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत.

गडचिरोली, दि.28 : सर्व जनतेला कळविण्यात येते की, उपपोलीस स्टेशन, राजाराम (खांदला) तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना, कवटाराम- कापेवंचा जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यात दिनांक 23.07.2017 रोजी झालेल्या गोळीबारात एक पुरुष अनोळखी ईसम मृत्यू झालेला होता. सदर अनोळखी मृतकाचे दंडाधिकारी तपास व चौकशी प्रक्रिया, उपविभागीय दंडाधिकारी अहेरी यांचे न्यायालयात सुरु असून वरील घटनेच्या संबंधात ज्या व्यक्ती यांना निवेदन/ प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे. त्यांनी ही प्रेस नोट प्रसिद्ध झाल्याचा दिनांकापासून 20 दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, अहेरी यांचे न्यायालयात स्वत: उपस्थित राहुन कार्यालयीन वेळेत सादर करावे. घटनेसंबंधी माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत, त्यांचे विनंतीनुसार गोपनियता बाळगणेत येईल याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अहेरी श्री. अंकित यांनी कळविले आहे.

नागेपल्ली येथील अंगणवाडी क्रमांक-१ येथे पल्स पोलियो लसीकरण मोहिमेचे शुभारंभ.

इमेज
सरपंच श्री लक्ष्मण कोडापे यांनी बालकाला पोलिओचा डोस देत केले शुभारंभ. नागेपल्ली:- दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा आरोग्य प्रशासन गडचिरोली यांच्या वतीने आज अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील अंगणवाडी क्रमांक-१ येथे पल्स पोलियो लसीकरण मोहिमेचे शुभारंभ नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच श्री लक्ष्मण कोडापे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी ० ते ५ वयोगटातील बालकाला पोलिओचा डोस पाजुन त्यांनी या पोलिओ मोहिमेचे शुभारंभ केले. यावेळी नागेपल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री रमेश शानगोंडावार, आरोग्य सेविका सडमेक व इतर उपस्थित होते.

मार्कंडा देवस्थान येथील यात्रेसह जिल्हयातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा जत्रांना मनाई.

इमेज
मंदिरामध्ये 50 लोकांच्या मर्यादेत धार्मिक कार्यक्रम करण्यास परवाणगी. गडचिरोली,दि.27: जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  प्राधिकरण, संजय मीणा गडचिरोली यांनी दिनांक 08 जानेवारी च्या शासन निर्देशाप्रमाणे तसेच उचित प्रतिबंधात्मक नियमावली आणि उपाययोजना अंतर्गत गडचिरोली जिल्यातील महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या सर्व यात्रा जत्रा रद्द केल्या आहेत.  तथापि सदर मंदिरामध्ये 50 लोकांच्या मर्यादेत धार्मिक कार्यक्रम करण्यास परवाणगी असेल. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्याचे जबाबदारी संबंधित क्षेत्राचे उपविभागीय दंडाधिकारी व तहसिलदार यांना देण्यात आली आहे. लसीकरणाबाबत कोविड बाबत सूट देणेकरीता राज्य शासनाच्या सूचना आहेत. सदर यादीनूसार गडचिरोली जिल्हा परिशिष्ठ अ मधे समाविष्ट नाही. गडचिरोली जिल्हयातील नागरी, ग्रामीण तसेच औद्यौगिक क्षेत्रातील जनतेस, व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशुन आदेशान्वये कोविड तरतुदी या जिल्हयात लागू आहेत. तथापि सद्यस्थितीत जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने, रुग्णांची संख्या कमी दिसून येत असली तरी सुध्दा विशेषत: मार्कंड...

जिल्हयात ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात.

इमेज
गडचिरोली,दि.27: रविवारी दिनांक 27 फेब्रुवारी 2022 ला पल्स पोलिओ माहिमेचे उद्घाटन महिला रुग्णालय, गडचिरोली येथे खासदार अशोक नेते यांचे हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, डॉ. सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.साळवे, जिल्हा स्तरीय नोडल अधिकारी पंकज हेमके उपसिथत होते. प्रा.आ. केंद्र कुनघाडा येथील पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांचे हस्ते संपन्न झाले.  यावेळी जिल्हा परिषद सदस्य अॅड.रामभाव मेश्राम, जिल्हास्तरीय नोडल अधिकारी पंकज हेमके, डॉ.प्रुफुल्ल हूलके, तालुका आरोग्य अधिकारी,  उपस्थित होते तर डॉ. कमल यांनी प्रा.आ. केंद्र कुनघाडा, प्रा.आ. केंद्र आमगांव, तालुका चामोर्शी यांच्या हस्ते पल्स पोलिओ लसीकरणाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच प्रा.आ. केंद्र बोदली येथे पल्स पोलिओ मोहिमेचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल श्रीहरी साळवे  यांचे हस्ते करण्यात आले.  पल्स पोलिओ लसीकरणाचे काम एकूण 2255 बुथ, 131 ट्रॉझीस्ट टीम, 95 मोबाईल टिम द्वारे  पार पाडण्यात आले.  0 ते 05 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना  पल्स...

मौजा छल्लेवाडा येथील ४०-५० वर्षापूर्वीचे अतिक्रमण जमिनींचे नियमानुकुल प्रक्रियेला सुरुवात.

इमेज
अहेरी :- अहेरी तालुक्यातील मौजा छल्लेवाडा येथील ४०-५० वर्षापुर्वीचे शेत जमिनींचा अतिक्रमण नियमानुकुल प्रक्रिया मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, श्री किशोरजी पोतदार साहेब संपर्क प्रमुख गडचिरोली जिल्हा, श्री विलासजी कोडापे साहेब सहसंपर्क प्रमुख गडचिरोली जिल्हा, श्री रियाजभाऊ शेख शिवसेना जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा, श्री अरुणजी धुर्वे उपजिल्हा प्रमुख अहेरी विधानसभा व श्री दिलीपजी सुरपाम युवासेना जिल्हा अधिकारी अहेरी विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री प्रभाकर डोंगरे युवासेना उपजिल्हा अधिकारी अहेरी विधानसभा यांनी छल्लेवाडा येथील ७९ शेतकऱ्यांचे अतिक्रमण नियमानुकुलचे अर्ज नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तहसिल कार्यालय, अहेरी येथे सादर करून प्रक्रियेला सुरू केले आहे. सदर अर्जावर तहसिलदार यांनी तलाठी यांना त्रुट्यांचीपुर्तता करून प्रकरण परत तहसिल कार्यालयात सादर करण्याबाबत पत्र दिले आहे.  तसेच छल्लेवाडा येथील काही राजकीय कार्यकर्ते आमची नक्कल करत काही नागरिकांकडुन १५०-२०० रुपये घेऊन अतिक्रमण नियमानुकुलचे कामे करून देणार असल्याचे खोटी म...

ग्रामपंचायत, नागेपल्ली येथे शिवजयंती साजरी करण्यात आली.

इमेज
अहेरी :- दि-१९/०२/२०२२ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत नागेपल्ली येथे सरपंच श्री लक्ष्मण कोडापे व उपसरपंच श्री रमेश शानगोंडावार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व द्विपप्रज्वलन करुन अभिवादन केले.  यावेळी ग्रा.पं सदस्य श्री मल्लरेड्डी यमनुरवार, श्री आशीष पाटील, श्री राहुल सिडाम, पोलीस पाटील श्री गणपत गुरनुले, सामाजिक कार्यकर्ता श्री संतोष अग्रवाल, श्री  चुनारकर काका, विशाल रापेल्लीवार, सुरेश बानोत, जावेद व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

ऑल इंडिया स्टुडेंट फेडरेशनची तालुका कार्यकारिणी गठित (कॉम्मुनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची विद्यार्थी शाखा).

इमेज
दिक्षा झाडे- तालुका प्रतिनिधी एटापल्ली एटापल्ली:- दि. १३ फेब्रुवारी २०२२ला वीर बाबुराव शेडमाके वाचनालय येते आयोजित विद्यार्थी मुक्त संवाद कार्यक्रम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद केल्यावर त्यांना भेडसावणारे विविध समस्या उदा.ऑनलाइन शिक्षण, बंद असलेले वसतिगृह, शाळा, कॉलेजमध्ये शिक्षक उपलब्ध नसणे,इत्यादि विविध समस्यांचे समाधान करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आवाज शासनापर्यत पोहचवणारी संघटनेची गरज लक्षात घेता कॉम्मुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (भाकपा)ची विद्यार्थी शाखा ऑल इंडिया स्टुडेंट फेडरेशन (AISF)ची तालुका कार्यकारिणी महाराष्ट्र राज्यद्याक्ष AISF कॉ.विराज देवांग, महाराष्ट्र राज्य कोषादयक्ष कॉ.प्रितेश धारगावे, AISF भंडारा उपाद्यक्ष कॉ. वैभव चोपकर, कॉ.सुरेश बारसागडे ता.सचिव कॉम्मुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कॉ.सचिन मोतकूरवार, कोषादयक्ष कॉ.सुरज जक्कुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आले. AISF च्या तालुकादयक्षपदी कॉ.स्वानंद मडावी, उपाद्यक्षपदी कॉ.धीरज सुंकेपाकवार व कॉ.सुश्मिता पांडे, सचिवपदी कॉ.प्रणय नरोटे, सहसचिवपदी कॉ. सुजल कथले व कॉ.शीतल कुंभारे, कोषादयक्षपदी कॉ.दत्त सडमेक,...

स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती प्रित्यर्थ जिमलगट्टा येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.

इमेज
जिमलगट्टा :- आज दि:- १५ फरवरीला शहिद विर बाबुराव शेडमाके क्रिकेट क्लब जिमलगठ्ठाच्या वतिने स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती प्रित्यर्थ जिमलगठ्ठा येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उदघाटक म्हणून मा. श्री रीयाजभाऊ शेख शिवसेना जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा हे तर अध्यक्ष म्हणुन मा. श्री सुजित कुमार क्षिरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगठ्ठा हे होते. सदर कार्यक्रमात आलेल्या पाहुन्यांचे गावाच्या वेशिवर स्वागत करुन आदिवासी वाद्य व नृत्याने मिरवनुकीद्वारे कार्यक्रमाच्या स्थळी घेऊन आले. त्यानंतर स्व.विर बाबराव शेडमाके यांचे प्रतिमेचे पुजन करुन मैदानावरील पिचवर रिबन कापुन व नारळ फोडुन विधिवत उदघाटन करण्यात आले. यावेळी मा. श्री किशोर पोतदार साहेब शिवसेना संपर्कप्रमुख गडचिरोली जिल्हा, मा. श्री विलासराव कोडापे सहसंपर्कप्रमुख गडचिरोली जिल्हा, मा. श्री अरुण धुर्वे उपजिल्हा प्रमुख अहेरी विधानसभा, मा. श्री बिरजु गेडाम अहेरी विधानसभा संघटक, मा.श्री दिलीप सुरपाम युवासेना जिल्हा अधिकारी अहेरी विधानसभा, मा.श्री प्रभाकर डोंगरे युवासेना उपजिल्हा अधिका...

डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज अमंत्रित.

गडचिरोली ,  दि. 10: राज्या तील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी "डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना" शासन निर्णय दि. ११/१०/२०१३ अन्वये कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरसांनी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय ,  नियोजन भवन ,  गडचिरोली येथे दि. १८ फ्रेबुवारी ,  २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटीची पुर्तता करवुन अंतिमरित्या सदर योजने अंतर्गत अनुदानास पात्र होणा-या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल. दि. दि. १८ फ्रेबुवारी ,  २०२२ नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीत ,  याची नोंद घ्यावी.

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना.

गडचिरोली ,  दि. 10:   राज्यातील "धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/ विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा ,  कनिष्ठ महाविद्यालये ,  औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना" अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णय ,  दि.७.१०.२०१५ अन्वये राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या अल्पसंख्याक बहूल शासनमान्य खाजगी शाळा ;  अपंग शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय ,  नियोजन भवन ,  गडचिरोली येथे दि. १८ फ्रेबुवारी २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटीची पुर्तता करवुन अंतिमरित्या सदर योजने अंतर्गत अनुदानास पात्र होणाऱ्या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल.

जिल्हयात 15 दिवस जमावबंदी आदेश लागू.

गडचिरोली ,  दि. 10:   साथरोग संदर्भाने आवश्यक उचित प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरु आहेत. व दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे.दिनांक 19 फेब्रुवारी 2022 व दिनांक 20 फेब्रुवारी 2022 रोजी पो.स्टे. सिरोंचा अंतर्गत मौजा सिरोंचा येथे हैदरशहा बाबा उर्स कमेटी सिरोंचा कडून उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तसेच काही  राजकीय पक्ष ,  संघटना व इतर नागरिक उत्सव ,  सभा ,  मिरवणुक सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करण्या ची श क्यता असल्याने सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने संपुर्ण गडचिरोली  जिल्ह्यात  दिनांक  10 . 02 .202 2  चे  00.01  वा. ते दिनांक  24 . 02 .202 2  चे  24.00  वा. पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम , 1951  चे कलम  37 (1)(3)  लागु  करण्यात आलेले आहे. त्यामुळे  सदर कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंध उपाय करणे आवश्यक आहे. ...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक.

गडचिरोली ,  दि. 10 :  सन 2022 मध्ये   महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध   स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडून निश्चित करण्यात आले असून  सदर वेळापत्रक आयोगाच्या  www.mpsc.gov.in   या संकेतस्थळावर (वेबसाईटवर)प्रसिध्द करण्यात आले आहे. शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन-2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहेत. प्रस्तावित परीक्षेचे वेळापत्रक निश्चित करताना संघ लोकसेवा आयोग,विविध विद्यापिठे परीक्षा घेणाऱ्या इतर संस्था इत्यादिंकडून  आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन आयोगाच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येते. जेणेकरुन, आयोगाच्या व संबंधित संस्थांच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही व उमेदवारांचे नुकसान होणार नाही.यासंदर्भात विधीमंडळातही अनेकवेळा चर्चा झाली असून त्यावेळी विधीमंडळात देण्यात आलेल्या आश्वासनानुसार कोणत्याही परीक्षा एकाच दिवशी येणार नाहीत, याची दक्षता घे...

कृषी यांत्रिकीकरण उपभियान 2021-22 अंतर्गत कृषी कल्याण अभियान योजना कृषी औजारे बँक स्थापने साठी अर्ज आमंत्रित.

गडचिरोली ,  दि. 10 :  कृषी यांत्रिकीकरण उपविभाग 2021-22 अंतर्गत कृषी कल्याण अभियान योजना अंतर्गत भाडे तत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरवठा साठी कृषी औजारे बँक स्थापना प्रति तालुका 2 या प्रमाणे 80 टक्के किंवा 8 लाख रुपये अनुदानावर राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जिल्हयास प्रति तालुका 2 या प्रमाणे लक्षांक प्राप्त झालेला आहे तरी लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट,नोंदणीकृत शेतकरी बचत गट व विविध कार्यकारी संस्था यांनी विहित नमुन्यात अर्ज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली कार्यालया मार्फत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालायात अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनेंचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे,संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र,खरेदी करावयाच्या यंत्र/औजारे संचाचे दरपत्रक व प्रशिक्षण पुरावा.आधार कार्ड सलग्न बँक खात्याचा पासबुक च्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत,संस्थेच्या सबंधित व्यक्तीच्या बॅक खात्यातून अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास प्राधिकृत केल्याचे पत्र व सबंधित व्...

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत विविध योजनांचे अर्ज आमंत्रित.

गडचिरोली , दि. 10 :  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2021-22 अंतर्गत भामरागड प्रकल्पांतर्गत येणाऱ्या भामरागड व एटापल्ली या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या गटाकरीता/लाभार्थ्यां करीता योजना मंजूर आहेत. तेव्हा सदर योजनांकरीता इच्छुक अनुसूचित जमातीच्या गटांकडुन/लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यातयेत आहेत. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अनुसूचित जमातीच्या गटांकरीता/लाभार्थ्यांकरीता/वि द्यार्थ्यांनी नमूद कागदपत्रासह परिपूर्ण भरलेले अर्ज प्रकल्प कार्यालय भामरागड व माहिती सुविधा केंद्र एटापल्ली (आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह एटापल्ली ) येथे दिनांक 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.अर्ज कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड कु.रोषना चव्हाण यांनी कळविले आहे.

महाडिबीटी पोर्टल शिष्यवृत्ती अर्ज सादर करण्याची अंतीम दि-15 फेब्रुवारी.

गडचिरोली , दि. 10 :   गडचिरोली जिल्हयातील सर्व कनिष्ठ/वरिष्ठ व व्यावसायीक/बिगर व्यावसायीक ,  अनुदानित व विनाअनुदानित  महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सुचीत करण्यात येते की ,  सन  20 20 - 2 1  व  202 1- 2 2  या शेक्षणिक सत्रातील प्रवेशित अनु.जाती ,  इमाव ,  विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर भरलेले शिष्यवृत्तीचे अर्ज  व नुतनीकरण  अर्ज  कर ण्या करीता अंतीम तारीख  15  फेब्रुवारी   2022  पर्यंत वा ढ विण्यात आलेली आहे. ज्या महाविद्यालयांनी अद्यापही पात्र अर्ज या  कार्यालयाकडे मंजूरी करीता सादर केलेले नाहीत ,  असे विद्यार्थि व महाविद्यालय स्तरावरील प्रलंबीत अर्ज आपले स्तरावर    व  योग्यरित्या तपासून या कार्यालयाकडे  दिनांक  15  फेब्रुवारी   2022   पर्यंत  सादर  करण्यात यावे. वरील कालावधीत  महाडिबीटी पोर्टलवरील पात्र प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी परिपुर्ण रित्या तपासणी करुन  विहीत  वेळेत  अर्ज...

राज्यात ‘नर्सरी हब’ सुरु करण्या संदर्भात कृषी विद्यापीठांनी प्रस्ताव सादर करावा - कृषीमंत्री दादाजी भुसे.

इमेज
मुंबई ,  दि. 9 : राज्यात एकाच ठिकाणी फुले ,  फळे व भाजीपाला तसेच रोपे ,  कलमे विक्री सुविधा केंद्र (नर्सरी हब) असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या रोपवाटिकाधारकांसाठी त्यांच्याकडील फळे ,  भाजीपाला ,  फुले ,  मसाला पिके ,  औषधी व सुगंधी वनस्पती इ. पिकांच्या कलमे-रोपे विक्रीसाठी एकत्रित सुविधा निर्माण व्हावी यासाठी राज्यात  ‘ नर्सरी हब ’  करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून कृषी विद्यापीठांनी यासंदर्भात प्रस्ताव सादर करावे ,  असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. मंत्रालयात राज्यात नर्सरी हब सुरु करण्यासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कृषी विद्यापीठांचे कुलगुरु ,  कृषी आयुक्त धीरज कुमार ,  रोपवाटिका उत्पादक शेतकरी प्रतिनिधी ,  संबंधित अधिकारी उपस्थित होते. राज्यातील विभागानुसार पीक पद्धतीचा अभ्यास करुन कृषी विद्यापीठांनी प्रायोगिक तत्वावर नर्सरी हब सुरु करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. अशी सूचना देऊन यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करावा ,  असे निर्देश श्री....

गडचिरोली येथील सेमाना देवस्थानात अवघ्या 1 तासात होणारा बालविवाह थांबविला- जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन 1098 गडचिरोली व पोलीस स्टेशन गडचिरोली यांची कार्यवाही.

इमेज
गडचिरोली , दि.09:  आज दिनाक 09/02/2022 रोज बुधवार गडचिरोली जिल्ह्यापासून पासून अगदी 2 किमी अंतर असलेल्या सेमाना देवस्थान या ठिकाणी दुपारी 01 वाजता एक बालविवाह होणार आहे अशी गोपनीय माहिती आज सकाळी 8 वाजता  मिळाली लगेच  जिल्हा बाल संरक्षण टीम गडचिरोली व चाईल्ड लाईन टीम यांनी सदर बालविवाह रोखण्याकरीता बालकाचे गाव गाठले व बालकाची जन्म पुरावा तपासणी करून  , बालक 18 वर्षाखालील असल्याची खात्री पटल्यानंतर लगेच जिल्हा बाल संरक्षण टीम यांनी बलिकेचे घरी विसापूर  गाठले व चौकशी अंती तिथे कसलीच हालचाल दिसून आली नाही नंतर मुलाचे घरी गोकुलनागर येथे चौकशी केली असता तिथे सुद्धा काहीच हालचाल दिसून आली नाही त्यानंतर जिल्हा बाल संरक्षण टीमने नियोजन करून चौकशी केली असता  सेमाना देवस्थान येथे लग्न होत असल्याची खात्री करून  , सर्व माहितीची शहानिशा झाल्यानंतर पोलीस स्टेशन गडचिरोली येथील पूनम गोरे साहाय्यक पोलीस निरीक्षक यांचे उपस्थितीत वर पक्ष व वधू पक्ष यांना एकत्र बसऊन बालविवाह बाबतचे दुष्परिणाम व कायदा नुसार होणारी कार्यवाही याबाबत उपस्थित सर्वांना माहिती देण्या...

21 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

इमेज
गडचिरोली ,  दि.0 9 :  जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला आयोजित करण्यात येते. या महिन्यात महिला लोकशाही दिन दिनांक 21 फेब्रुवारी 2022, रोज (सोमवार)  सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या दालनात आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक,आस्थापना विषयक बाबी असे प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार,निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहीत नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे स्विकारण्यात येईल. तालुक्यास्तरावरील महिला लोकशाही दिन हा प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारला आयोजित केल्या जातो त्याकरीता अर्जाचा नमुना तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयात निशुल्क प्राप्त होईल व तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनात प्राप्त तक्रारीच्या टोकन नंबरशिवाय जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात अपील अर्ज स्विकृत केले जाणार नाही याची नोंद घ्याव...

मंत्री वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा होणार कायापालट.

इमेज
ताडोबाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प करण्यात येणार. निधी उपलब्धता व इतर मागण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक. योग्य नियोजन करून आराखडा सादर करण्याच्या सूचना. नागपूर/चंद्रपूर, दि. 4 फेब्रु : जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प हा वाघ दर्शनासाठी तसेच इतर वन्य प्राण्यांच्या सहज दर्शनासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. या प्रकल्पाचे पर्यावरण संवर्धन व पर्यटन क्षेत्र विकासासाठी उपाययोजना व त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. त्यानुसार व्हीसीद्वारे मुख्यमंत्र्यांनी ताडोबाचा नुकताच आढावा घेतला. या मागण्यांबाबत मुख्यमंत्री अतिशय सकारात्मक असल्यामुळे आता ताडोबा प्रकल्पाचा कायापालट होण्यास मदत होईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली.  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटनाच्या दृष्टिकोनातून व्याघ्र सफारी निर्माण करणे,...

कौशल्य चाचणी तथा सरळ प्रवेश प्रक्रीया द्वारे क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश.

गडचिरोली , दि. 03 :  आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याचे उद्देशाने महाराष्ट्र शासनाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत  ११  क्रीडा प्रबोधिनीची स्थापना केली आहे. या क्रीडा प्रबोधिनीमधून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे यासाठी शासनातर्फे कौशल्य खेळाडू शोध मोहीम राबविली जात आहे.   ७   फेब्रुवारी   २०२२   पासून   ही   टॅलेंट   सर्च   मोहीम   राबविली   जाणार   असून   यात   राज्य   व   राष्ट्रीय   स्तरावर   पोहचलेल्या   खेळाडूंना   प्रवेश   दिला   जाणार   आहे .  राज्यातील   एकूण   ९   क्रीडा   प्रबोधिनीमध्ये    प्रवेशासाठी   सरळ   प्रवेश   प्रक्रीया   व   कौशल्य   चाचणी   अंतर्गत   निवासी   क्रीडा   प्रबोधिनीमध्ये   प्रवेश   देण्यासाठी   महाराष्ट्र   शासनाच्या   वतीने   भरती   प्रक्रीया   सुरू   करणार   आहे .  यासाठी   ...

पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजना शिष्यवृत्तीसाठी डीबीटीवर15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करा.

इमेज
गडचिरोली , दि.0 3 :  अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजना  2021-22  या शैक्षणिक वर्षासाठी महाडिबीटी पोर्टलवर विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जासाठी  31  जानेवारी अंतिम मुदत होती. अनेक विद्यार्थ्यांची महापोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने  15  फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी   http:// mahadbtmahait.gmail.in   या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावे. शिष्यवृत्ती ,  शिक्षण फी ,  परीक्षा फी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाही ,  त्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. उच्च शिक्षणातील काही विषयातील प्रवेश प्रक्रिया व राऊंड सुरू असल्याने विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रीकसाठी अर्ज करणे व पूर्वीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या योजना ,  अर्ज करण्याचे निकष व अटी सदर संके...

स्टॅड अप इंडिया योजनेत मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याच्या योजनेबाबत अर्ज आमंत्रित.

इमेज
गडचिरोली , दि.0 3 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  दिनांक 8 मार्च,2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टॅड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक स्टॅडई-2020/प्र.क्र.23/अजाक,दि .9 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आल्या आहेत. सदरचा शासन  निर्णय  शासनाच्या  www.maharashtra.gov.in   या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. सदर योजनेकरीता इच्छूक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांचे कडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

"समान संधी केंद्र" च्या वतीने विद्यार्थ्यांना मिळणार मार्गदर्शनविकास व गुणवत्ता वाढीसाठी समाज कल्याण विभागाचा प्रयत्न.

गडचिरोली , दि.0 3 :  विविध महाविद्यालयातील मागासवर्गीय मुला-मुलींना शिष्यवृत्ती ,  फ्रीशिप व इतर शासनाच्या योजना व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासोबत उद्योजकता व्यवसाय व रोजगार निर्मितीसाठी आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येते. संवाद अभियान- युवा संवाद सारखे कार्यक्रम सुरु करण्याकरिता महाविद्यालयामध्येच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी "समान संधी केंद्रे" -( Equal Opportunity Centre)  स्थापन करण्यात येणार आहे.   प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहाय्यक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच "समान संधी केंद्रे" सुरू करण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. केंद्र शासन पुरस्कृत भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेच्या सुधारित विकासासह त्याचे सर्व मार्गदर्शक सूचनांमध्ये देखील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकास व व्यवसाय रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने या केंद्राच्या माध्यमातून उपायोजना करण्याचे ठरवले आहे. सदर  “ समान संधी केंद्राच्या ”  माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील...

नवीन महिला धोरणात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य- महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर.

इमेज
मुंबई ,  दि. 2 : सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. महिलांनी सायबर साक्षर असणे काळाची गरज आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांची सतर्कता महत्त्वाची आहे. महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन नवीन महिला धोरण तयार करण्यात येणार असून महिला धोरणात महिलाविषयक कायदे व त्याची अंमलबजावणी याच्या जनजागृतीवर भर देणार आहे , असे  महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती  ठाकूर यांनी सांगितले. सुधारित महिला धोरणाबाबत प्रारूप मसुद्यावर चर्चा याबाबत महिला व बाल विकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस महासंचालक ,  सर्व विशेष पोलीस महानिरीक्षक ,  उपमहानिरीक्षक ,  पोलीस आयुक्त ,  पोलीस अधीक्षक यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन ,  सहसचिव श.ल.अहिरे ,  अवर सचिव महेश वरुडकर उपस्थित होते. महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या ,  महिला धोरणाबाबत विभागामध्ये बैठका घेत असून त्याच्या अंमलबजावणी तसेच त्यामध्ये अधिक कोणत्या बाबी समाविष...

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुलाखत.

इमेज
मुंबई ,  दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित  ' जय महाराष्ट्र '  या कार्यक्रमात मदत व पुनर्वसन ,  आपत्ती व्यवस्थापन , बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची  विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे. गुरूवार दि. 3 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत ,  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मिडियावरील पुढील लिंकवर पाहता येईल.   यू ट्यूब  https://www.youtube.com/ MAHARASHTRADGIPR फेसबुक  https://www.facebook.com/ MahaDGIPR ट्विटर -  https://twitter.com/MahaDGIPR   कोविडसारखे अचानक आलेले संकट ,  राज्यात अचानक आलेली चक्रीवादळे ,  मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी ,  पूर कालावधीत झालेली मोठ्या प्रमाणातील जिवित व वित्तहानी अशा अनेक संकटांचा सामना करीत असताना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन ,  मदत व पुनर्वसन विभागाने गेल्या दोन वर्षात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व त्यांची अंमलबजावणी ,  इतर मागासवर्ग समाजाच्या सर्वांगीण विकासा...

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन.

इमेज
मुंबई ,  दि. 2 : महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय ,  मुंबई शहर येथे सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात येणार आहे ,  अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ,  मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी. यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित केला जाणार आहे. या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्याकरिता तक्रार अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय ,  117 बी.डी.डी. चाळ ,  पहिला मजला ,  वरळी मुंबई  ४०००१८  येथे उपलब्ध आहे. अर्ज स्वि...

गडचिरोली जिल्हयात 278 कोरोनामुक्त, नवीन 154 कोरोनाबाधित कोमॉर्बीड तिघांचा कोरोनाने मृत्यू .

इमेज
गडचिरोली , दि.01:  आज गडचिरोली जिल्हयात 719 कोरोना तपासण्यांपैकी 154 नविन कोरोना बाधित झाले असून 278 जणानी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.  जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 34858 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 32953 आहे. तसेच सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 1146 झाली आहे. तीन मृत्यूमध्ये अहेरी तालुक्यातील 72 वर्षीय पुरुषाचा श्वसन आजाराने ,  व 71 वर्षीय पुरुषाचा उच्च रक्तदाबामुळे ,  गडचिरोली तालुक्यातील 28 वर्षीय तरुणांचा किडनी आजाराने ग्रस्तचा समावेश आहे. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 759 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.53 टक्के ,  सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.29 टक्के तर मृत्यू दर 2.18. गडचिरोली तालुक्यातील 28 , अहेरी तालुक्यातील 10 , आरमोरी तालुक्यातील 04 , भामरागड तालुक्यातील 02 ,  चामोर्शी तालुक्यातील 52 ,  धानोरा तालुक्यातील 01 ,  मुलचेरा तालुक्यातील 19 , सिरोंचा तालुक्यातील 01 ,  कोरची तालुक्यातील 09 ,  कुरखेडा तालुक्यातील 03 ,  आणि व...

मौजा मर्दीनटोला जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत.

गडचिरोली ,  दि.01 :  मौजा- मर्दीनटोला जंगल परिसरात ,  पोलीस मदत केंद्र गॅरापत्ती ,  पोलीस स्टेशन कोरची, जिल्हा गडचिरोली जंगल परिसरात  दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत ,  पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना मर्दीनटोला जंगल परिसरात पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान एकेवीस(21) पुरुष व  सहा महिलांचे  मृतदेह सापडल्याने  सदर मृत्यूचे कारण तपास  करणेकामी दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया ,  सुरु केली असून सदर प्रकरणात फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये चौकशी करावयाची आहे. तरी वरील घटनेबाबत कोणत्याही व्यक्तीस माहिती असल्यास घटनास्थळी ,  प्रत्यक्षदर्शी चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह  उपविभागीय दंडाधिकारी , कुरखेडा यांचे समक्ष शपथेवर जाहीर सूचना दिनांक 15 फेब्रुवारी 2022 कार्यालयीन वेळेत सादर करावीत असे उपविभागीय दंडाधिकारी ,  कुरखेडा यांनी कळविले आहे. चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन लेखी निवेदन द्यावे. घटनेचे आपण पा...

सहा तालुक्यात १०० दिवस कोरोना व टीबी बाबत होणार जनजागृती.

इमेज
केंद्र शासन व पिरामल संस्थेच्या सहयोगाने  ' आश्वासन '  मोहिमेला जिल्हयात सुरुवात. गडचिरोली ,  दि.०१ :  कोविड आणि टीबी आजारांच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठीच्या "आश्वासन" मोहीमेला आज गडचिरोली जिल्हयात सुरूवात झाली. या मोहिमेतील वाहनांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी हिरवी झेंडी दाखविली. देशात १०० दिवसांत १०० जिल्हयांमध्ये  "आश्वासन" मोहीम शासनाच्या व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून राबविली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ०६ आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये प्रचार वाहनांद्वारे पिरामल संस्थेच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. लोकांमधील कोविड लसीबद्दलचे गैरसमज आणि संकोच दूर व्हावा आणि सर्वसामान्यांना कोविड अनुकूल वर्तन अंगीकारण्यास प्रोत्साहित करता यावे यासाठी सहा तालुक्यात कामे केली जाणार आहेत. यामध्ये संस्थेकडून आदिवासी लोकसंख्या २५ टक्के पेक्षा जास्त असलेल्या अहेरी ,  भामरागड ,  एटापल्ली ,  धानोरा ,  कोरची व कुरखेडा या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच क्षयरोगाच्या संभाव्य रूग्णांची गावपातळीवर शोध मोहिमेद्वारे लक्षणां...

कोविड बाबत 1 फेब्रुवारी 2022 पासून जिल्ह्यात पर्यटन स्थळे, बगीचे तसेच अंत्यविधी बाबत सुधारीत आदेश.

इमेज
गडचिरोली , दि.01:  शासन व जिल्हा प्रशासनाचे आदेशान्वये ,  राज्यात व जिल्ह्यात कोविड-19 ओमायक्रॉन विषाणूचे झपाट्याने संक्रमण होत असल्याने सदर साथरोगसंदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनानंतर्गत नियमावली व उपाययोजना लागू करण्यात आले आहे. ,  दिनांक 31.01.2022 चे शासन आदेशामध्ये  लसीकरणाच्या मापदंडानुसार जिल्ह्याचे वर्गीकरण करण्यात आले असून ज्या जिल्ह्यांमध्ये 30 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पात्र लोकसंख्येच्या पहिल्या डोसचे 90% पेक्षा जास्त लसीकरण तसेच दोन्ही डोसचे 70% लसीकरण झाले आहे असे जिल्ह्यांकरिता निर्बंधांमध्ये अतिरिक्त शिथिलता देण्यात आलेली आहे. ही यादी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिशिष्ट अ मध्ये नमूद अधिकृत माहितीनुसार लसीकरणाची टक्केवारी विचारात घेऊन दर आठवड्याला अद्ययावत केली जाणार असून त्यानुसार जिल्ह्याची यादी अद्यावत करण्यात येणार आहे. तथापि सदर परिशिष्ट मध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश नाही.  जिल्हाधिकारी व जिल्हाकदंडाधिकारी तथा अध्यक्ष ,  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ,  गडचिरोली संजय मीणा यांनी दिनांक...