डॉ.झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी अर्ज अमंत्रित.

गडचिरोलीदि.10:राज्यातील मदरसांच्या आधुनिकीकरणासाठी "डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना" शासन निर्णय दि. ११/१०/२०१३ अन्वये कार्यान्वीत करण्यात आली आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या मदरसांनी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालयनियोजन भवनगडचिरोली येथे दि. १८ फ्रेबुवारी२०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटीची पुर्तता करवुन अंतिमरित्या सदर योजने अंतर्गत अनुदानास पात्र होणा-या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल. दि. दि. १८ फ्रेबुवारी२०२२ नंतर प्राप्त होणारे प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाहीतयाची नोंद घ्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.