ऑल इंडिया स्टुडेंट फेडरेशनची तालुका कार्यकारिणी गठित (कॉम्मुनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची विद्यार्थी शाखा).
एटापल्ली:- दि. १३ फेब्रुवारी २०२२ला वीर बाबुराव शेडमाके वाचनालय येते आयोजित विद्यार्थी मुक्त संवाद कार्यक्रम च्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद केल्यावर त्यांना भेडसावणारे विविध समस्या उदा.ऑनलाइन शिक्षण, बंद असलेले वसतिगृह, शाळा, कॉलेजमध्ये शिक्षक उपलब्ध नसणे,इत्यादि विविध समस्यांचे समाधान करण्यासाठी विद्यार्थ्यांचे आवाज शासनापर्यत पोहचवणारी संघटनेची गरज लक्षात घेता कॉम्मुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (भाकपा)ची विद्यार्थी शाखा ऑल इंडिया स्टुडेंट फेडरेशन (AISF)ची तालुका कार्यकारिणी महाराष्ट्र राज्यद्याक्ष AISF कॉ.विराज देवांग, महाराष्ट्र राज्य कोषादयक्ष कॉ.प्रितेश धारगावे, AISF भंडारा उपाद्यक्ष कॉ. वैभव चोपकर, कॉ.सुरेश बारसागडे ता.सचिव कॉम्मुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, कॉ.सचिन मोतकूरवार, कोषादयक्ष कॉ.सुरज जक्कुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आले.
AISF च्या तालुकादयक्षपदी कॉ.स्वानंद मडावी, उपाद्यक्षपदी कॉ.धीरज सुंकेपाकवार व कॉ.सुश्मिता पांडे, सचिवपदी कॉ.प्रणय नरोटे, सहसचिवपदी कॉ. सुजल कथले व कॉ.शीतल कुंभारे, कोषादयक्षपदी कॉ.दत्त सडमेक, युवती समन्वयपदी कॉ.निर्मला गोटा यांसह 39 सदस्यीय ता.कोन्सिलची निवड करण्यात आली. या अधिवेशनात कॉ.शरीफ शेख, कॉ.किशोर चंकापुरे व इतर भाकपा सदस्य यांचे सहकार्य व प्रत्यक्ष सहभाग लाभला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा