स्टॅड अप इंडिया योजनेत मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याच्या योजनेबाबत अर्ज आमंत्रित.

गडचिरोली,दि.03:सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  दिनांक 8 मार्च,2019 अन्वये केंद्र शासनाच्या स्टॅड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरीता मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेच्या मार्गदर्शक सूचना शासन निर्णय क्रमांक स्टॅडई-2020/प्र.क्र.23/अजाक,दि.9 डिसेंबर 2020 अन्वये शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आल्या आहेत. सदरचा शासन निर्णय शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर निरीक्षणासाठी उपलब्ध आहे. सदर योजनेकरीता इच्छूक लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली यांचे कडे शासन निर्णयातील नमूद करण्यात आलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करुन प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण गडचिरोली यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.