मौजा छल्लेवाडा येथील ४०-५० वर्षापूर्वीचे अतिक्रमण जमिनींचे नियमानुकुल प्रक्रियेला सुरुवात.

अहेरी :- अहेरी तालुक्यातील मौजा छल्लेवाडा येथील ४०-५० वर्षापुर्वीचे शेत जमिनींचा अतिक्रमण नियमानुकुल प्रक्रिया मा.श्री एकनाथजी शिंदे साहेब नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, श्री किशोरजी पोतदार साहेब संपर्क प्रमुख गडचिरोली जिल्हा, श्री विलासजी कोडापे साहेब सहसंपर्क प्रमुख गडचिरोली जिल्हा, श्री रियाजभाऊ शेख शिवसेना जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा, श्री अरुणजी धुर्वे उपजिल्हा प्रमुख अहेरी विधानसभा व श्री दिलीपजी सुरपाम युवासेना जिल्हा अधिकारी अहेरी विधानसभा यांच्या मार्गदर्शनाखाली मा श्री प्रभाकर डोंगरे युवासेना उपजिल्हा अधिकारी अहेरी विधानसभा यांनी छल्लेवाडा येथील ७९ शेतकऱ्यांचे अतिक्रमण नियमानुकुलचे अर्ज नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात तहसिल कार्यालय, अहेरी येथे सादर करून प्रक्रियेला सुरू केले आहे. सदर अर्जावर तहसिलदार यांनी तलाठी यांना त्रुट्यांचीपुर्तता करून प्रकरण परत तहसिल कार्यालयात सादर करण्याबाबत पत्र दिले आहे. 

तसेच छल्लेवाडा येथील काही राजकीय कार्यकर्ते आमची नक्कल करत काही नागरिकांकडुन १५०-२०० रुपये घेऊन अतिक्रमण नियमानुकुलचे कामे करून देणार असल्याचे खोटी माहिती पसरवित आहे. अहेरी विधानसभेतील अनेक वरिष्ठ नेते निवडणुकी दरम्यान नागरिकांची दिशाभुल करून अतिक्रमण नियमानुकुल संबंधित शासन प्रशासनास अनेकवेळा पत्रव्यवहार केले. परंतु सदर प्रकरणाची अपुर्ण माहिती गोळा करून अयोग्य मार्गाने दिखाव्यासाठी पत्रव्यवहार केल्याने सदर कामे झाले नाहीत. तरी नागरिकांनी खोट्या माहितीकडे लक्ष व कोणालाही पैसे न देता स्वतःचे काम स्वतः करून घ्यावे व काही अडचण उद्भवल्यास संपर्क साधन्याचे कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.