केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत विविध योजनांचे अर्ज आमंत्रित.

गडचिरोली,दि.10प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2021-22 अंतर्गत भामरागड प्रकल्पांतर्गत येणाऱ्या भामरागड व एटापल्ली या तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या गटाकरीता/लाभार्थ्यां करीता योजना मंजूर आहेत. तेव्हा सदर योजनांकरीता इच्छुक अनुसूचित जमातीच्या गटांकडुन/लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यातयेत आहेत. योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक अनुसूचित जमातीच्या गटांकरीता/लाभार्थ्यांकरीता/विद्यार्थ्यांनी नमूद कागदपत्रासह परिपूर्ण भरलेले अर्ज प्रकल्प कार्यालय भामरागड व माहिती सुविधा केंद्र एटापल्ली (आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह एटापल्ली ) येथे दिनांक 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावे. त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.अर्ज कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल यांची नोंद घेण्यात यावी असे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड कु.रोषना चव्हाण यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.