कवटाराम- कापेवंचा जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत.

गडचिरोली, दि.28 : सर्व जनतेला कळविण्यात येते की, उपपोलीस स्टेशन, राजाराम (खांदला) तालुका अहेरी, जिल्हा गडचिरोली अंतर्गत, पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना, कवटाराम- कापेवंचा जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यात दिनांक 23.07.2017 रोजी झालेल्या गोळीबारात एक पुरुष अनोळखी ईसम मृत्यू झालेला होता.

सदर अनोळखी मृतकाचे दंडाधिकारी तपास व चौकशी प्रक्रिया, उपविभागीय दंडाधिकारी अहेरी यांचे न्यायालयात सुरु असून वरील घटनेच्या संबंधात ज्या व्यक्ती यांना निवेदन/ प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे. त्यांनी ही प्रेस नोट प्रसिद्ध झाल्याचा दिनांकापासून 20 दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी, अहेरी यांचे न्यायालयात स्वत: उपस्थित राहुन कार्यालयीन वेळेत सादर करावे. घटनेसंबंधी माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत, त्यांचे विनंतीनुसार गोपनियता बाळगणेत येईल याची नोंद घ्यावी, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, अहेरी श्री. अंकित यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.