धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांसाठी पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना.

गडचिरोली, दि.10: राज्यातील "धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी अनुदानित/ विना अनुदानित/कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना" अल्पसंख्याक विकास विभागाच्या शासन निर्णय, दि.७.१०.२०१५ अन्वये राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता अनुदान मिळवू इच्छिणा-या अल्पसंख्याक बहूल शासनमान्य खाजगी शाळा; अपंग शाळा व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांनी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती कार्यालय, नियोजन भवन, गडचिरोली येथे दि. १८ फ्रेबुवारी २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. प्राप्त प्रस्तावांची छाननी करुन त्रुटीची पुर्तता करवुन अंतिमरित्या सदर योजने अंतर्गत अनुदानास पात्र होणाऱ्या संस्थांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनास सादर करण्यात येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

मुख्य अभियंता व कंत्राटदारावर ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करा – सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांची मागणी.