'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची मुलाखत.
मुंबई, दि. 2 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमात मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ निवेदक दीपक वेलणकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.
गुरूवार दि. 3 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सोशल मिडियावरील पुढील लिंकवर पाहता येईल.
यू ट्यूब https://www.youtube.com/
फेसबुक https://www.facebook.com/
ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR
कोविडसारखे अचानक आलेले संकट, राज्यात अचानक आलेली चक्रीवादळे, मोठ्या प्रमाणात झालेली अतिवृष्टी, पूर कालावधीत झालेली मोठ्या प्रमाणातील जिवित व वित्तहानी अशा अनेक संकटांचा सामना करीत असताना राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने गेल्या दोन वर्षात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय व त्यांची अंमलबजावणी, इतर मागासवर्ग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेले निर्णय आदि विषयांची सविस्तर माहिती, मंत्री श्री.विजय वडेट्टीवार यांनी 'जय महाराष्ट्र' या कार्यक्रमातून दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा