मौजा मर्दीनटोला जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीत झालेल्या मृत्यूच्या शोध मोहिमेबाबत.

गडचिरोली, दि.01मौजा- मर्दीनटोला जंगल परिसरातपोलीस मदत केंद्र गॅरापत्ती, पोलीस स्टेशन कोरची, जिल्हा गडचिरोली जंगल परिसरात  दिनांक 13 नोव्हेंबर 2021 रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गतपोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना मर्दीनटोला जंगल परिसरात पोलीस व नक्षल चकमकीदरम्यान एकेवीस(21) पुरुष व  सहा महिलांचे  मृतदेह सापडल्याने  सदर मृत्यूचे कारण तपास  करणेकामी दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रियासुरु केली असून सदर प्रकरणात फौजदार प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 176 अन्वये चौकशी करावयाची आहे. तरी वरील घटनेबाबत कोणत्याही व्यक्तीस माहिती असल्यास घटनास्थळीप्रत्यक्षदर्शी चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन आपले लेखी निवेदन शपथपत्रासह  उपविभागीय दंडाधिकारी,कुरखेडा यांचे समक्ष शपथेवर जाहीर सूचना दिनांक 15 फेब्रुवारी 2022 कार्यालयीन वेळेत सादर करावीत असे उपविभागीय दंडाधिकारीकुरखेडा यांनी कळविले आहे.

चौकशीमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी पुढील मुद्यांना अनुसरुन लेखी निवेदन द्यावे. घटनेचे आपण पाहिल्याप्रमाणे वर्णनआपला या घटने विषयीचा अनुभवघटनेनंतर किंवा आधी या घटनेशी काही घटना घडली असल्यास त्या विषयी माहिती सरकारी किंवा अन्य यंत्रणेच्या प्रतिक्रिया किंवा सहभाग यांच्या विषयी म्हणणेया घटनेशी संबंधित इतर कोणतीही माहिती, उप विभागीय दंडाधिकारी, कुरखेडा यांचे समक्ष शपथेवर निवेदन दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.