नागेपल्ली येथील अंगणवाडी क्रमांक-१ येथे पल्स पोलियो लसीकरण मोहिमेचे शुभारंभ.

सरपंच श्री लक्ष्मण कोडापे यांनी बालकाला पोलिओचा डोस देत केले शुभारंभ.
नागेपल्ली:- दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी जिल्हा आरोग्य प्रशासन गडचिरोली यांच्या वतीने आज अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील अंगणवाडी क्रमांक-१ येथे पल्स पोलियो लसीकरण मोहिमेचे शुभारंभ नागेपल्ली ग्रामपंचायतचे सरपंच श्री लक्ष्मण कोडापे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी ० ते ५ वयोगटातील बालकाला पोलिओचा डोस पाजुन त्यांनी या पोलिओ मोहिमेचे शुभारंभ केले.

यावेळी नागेपल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री रमेश शानगोंडावार, आरोग्य सेविका सडमेक व इतर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.