पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजना शिष्यवृत्तीसाठी डीबीटीवर15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करा.

गडचिरोली,दि.03अनुसूचित जाती व नवबोद्ध घटकातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रीक स्कॉलरशिप योजना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी महाडिबीटी पोर्टलवर विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजनांच्या अर्जासाठी 31 जानेवारी अंतिम मुदत होती. अनेक विद्यार्थ्यांची महापोर्टलवर अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने 15 फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

पात्र विद्यार्थ्यांनी http://mahadbtmahait.gmail.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावे. शिष्यवृत्तीशिक्षण फीपरीक्षा फी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाहीत्यांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. उच्च शिक्षणातील काही विषयातील प्रवेश प्रक्रिया व राऊंड सुरू असल्याने विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रीकसाठी अर्ज करणे व पूर्वीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या योजनाअर्ज करण्याचे निकष व अटी सदर संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करावेअसे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सिध्दार्थ गायकवाड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.