स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती प्रित्यर्थ जिमलगट्टा येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन.
जिमलगट्टा :- आज दि:- १५ फरवरीला शहिद विर बाबुराव शेडमाके क्रिकेट क्लब जिमलगठ्ठाच्या वतिने स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृती प्रित्यर्थ जिमलगठ्ठा येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उदघाटक म्हणून मा. श्री रीयाजभाऊ शेख शिवसेना जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा हे तर अध्यक्ष म्हणुन मा. श्री सुजित कुमार क्षिरसागर उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगठ्ठा हे होते.
सदर कार्यक्रमात आलेल्या पाहुन्यांचे गावाच्या वेशिवर स्वागत करुन आदिवासी वाद्य व नृत्याने मिरवनुकीद्वारे कार्यक्रमाच्या स्थळी घेऊन आले. त्यानंतर स्व.विर बाबराव शेडमाके यांचे प्रतिमेचे पुजन करुन मैदानावरील पिचवर रिबन कापुन व नारळ फोडुन विधिवत उदघाटन करण्यात आले.
यावेळी मा. श्री किशोर पोतदार साहेब शिवसेना संपर्कप्रमुख गडचिरोली जिल्हा, मा. श्री विलासराव कोडापे सहसंपर्कप्रमुख गडचिरोली जिल्हा, मा. श्री अरुण धुर्वे उपजिल्हा प्रमुख अहेरी विधानसभा, मा. श्री बिरजु गेडाम अहेरी विधानसभा संघटक, मा.श्री दिलीप सुरपाम युवासेना जिल्हा अधिकारी अहेरी विधानसभा, मा.श्री प्रभाकर डोंगरे युवासेना उपजिल्हा अधिकारी अहेरी विधानसभा, मा.श्री बगमारे पोलीस उपनिरीक्षक जिमलगठ्ठा, मा. श्री महेश मद्देर्लावार अध्यक्ष व्यापारी सघंटना जिलमगठ्ठा, श्री संजय आत्राम शिवसैनीक व इतर मान्यवर उदघाटन कार्यक्रमाचे वेळी प्रमुख पाहुणे म्हनुन उपस्थित होते.
उदघाटना प्रसंगी मा. श्री रीयाजभाऊ शेख, मा. श्री अरुण धुर्वे, मा. श्री विलासराव कोडापे, मा. श्री किशोर पोतदार साहेब, मा. श्री सुजीत कुमार क्षिरसागर साहेब यांनी समयोचित विचार व्यक्त केले व प्रास्ताविक श्री महेश मद्देर्लावार यांनी केले.
या स्पर्धेचे प्रथम बक्षिस ५१ हजार रुपये मा. श्री रियाजभाऊ शेख शिवसेना जिल्हाप्रमुख अहेरी विधानसभा यांचे कडुन, दुसरे बक्षिस ३१ हजार रुपये पोलीस स्टेशन जिमलगठ्ठा यांच्या कडुन व तिसरे बक्षिस २१ हजार श्री महेश मद्देर्लावार अध्यक्ष व्यापारी संघटना जिमलगठ्ठा यांचे कडुन देण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा