पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ब्रेक दी चैन अंतर्गत जिल्ह्यात 15 मे 2021 पर्यंत जमावबंदी व टाळेबंदी जाहीर.

इमेज
गडचिरोली : -  दि.30 :  राज्यात कोविड-19 साथरोग संदर्भाने उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनानंतर्गत  फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्ह्यात मनाई आदेश व कोविड-19 साथरोग संदर्भान मिशीन बिगीन अगेन अंतर्गत नियमावली व उपाययोजना जिल्ह्यात लागू आहेत.  त्याअनुषंगाने शासन आदेशातील तरतुदीच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रातील जनतेस, खालील व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून यापूर्वी लागू असलेले लॉकडाऊन संदर्भात आदेश काढणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी शासन निर्देशाप्रमाणे कोविड-19 साथरोग अंतर्गत ब्रेक द चैन अंतर्गत वेळोवेळी सुरु केलेले व प्रतिबंधीत बाबींना जिल्हा गडचिरोली क्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदी संदर्भात नियमावली आणि उपाययोजना कालावधी 01 मे 2021 चे सकाळी 07.00 वाजेपासून दिनांक 15 मे 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंत लागू करीत आहे.  यापुर्वीचे शासन आदेशातील अटी, शर्ती दंडाबाबत निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे सर्व संबंधित व्यक्त...

शेतकरी गटाने कृषी अवजारे योजनेचा लाभ घ्यावा.

गडचिरोली : -  दि.30 :  क ु रखेडा- मानव विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकरी गटांना विविध उपकरणे उपलब्ध करूनदेण्याची योजना आहे कुरखेडा तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी ,  शेतकरी उत्पादक कंपनी यांनी या   योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कुरखेडा तथा निवड समिती सचिव कु.सुरभी  बाविस्कर यांनी केले आहे. सन- 2020-21  या वर्षाकरिता अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील शेतकरी गटांना विविध उपकरणेउपलब्ध करून देण्याचे योजनेत राईस डी हासकिंग   मशीन , भात झोडणी यंत्र ,  बहुपीक टोकण यंत्र तथा  भाजीपाला रिजर व कोळपे  ,  ताडपत्री पॅकिंगसह ,  स्वयंरोजगार किट ,  हस्त चलित कडबा कट अडकित्ता इत्यादी  साहित्य उपलब्ध करून देण्याकरिता कुरखेडा तालुक्याची निवड करण्यात आलेली आहे.तरी तालुक्यातील नोंदणीकृत शेतकरी गटांनी ,  शेतकरी कंपन्यांनी ,  महिला शेतकरी बचत गटांनी ,  सेंद्रिय शेतीबचत गट यांनी विहित नमुन्यातील अर्ज दिनांक  12  मे  2021  पर्यंत तालुका कृषी अधिकारी ,   कार्यालय कुरखेडा ...

आज गडचिरोली जिल्ह्यात 16 मृत्यूसह 519 नवीन कोरोना बाधित तर 577 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : -  दि. 30:   आज जिल्हयात  519  नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज  577  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 2 1177  पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या  16225  वर पोहचली. तसेच सद्या 4 552  सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण  400  जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज  16  नवीन मृत्यूमध्ये  65  वर्षीय पुरुष आष्टी ता.चामोर्शी ,63 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा , 43 वर्षीय पुरुष आलापल्ली ता.अहेरी, 65वर्षीय पुरुष देसपूर ता. आरमोरी, 20 वर्षीय महिला पेट ता. चामोर्शी, 67 वर्षीय पुरुष गोगांव ता. गडचिरोली, 51 वर्षीय पुरुष वडधा ता. आरमोरी, 70 वर्षीय पुरुष वडसा, 58 वर्षीय पुरुष गडचिरोली, 33 वर्षीय पुरुष कुरखेडा , 68 वर्षीय पुरुष विसोरा ता. वडसा, 40 वर्षीय पुरुष मोझरी ता. आरमोरी, 50 वर्षीय पुरुष नागभीड जि. चंद्रपूर, 80 वर्षीय पुरुष एटापल्ली, 69 वर्षीय पुरुष हरबी डोंगरगांव ता. वडसा, 65 वर्षीय पुर...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी.

इमेज
गडचिरोली : -  दि.30 :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज   यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपाडे  यांनी   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .  यावेळी प्र.तहसिलदार किशोर भांडारकर, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे,   श्री. चंहादे,  दयाराम मेश्राम, जी. आर. मालवी,  जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर बेले, वामन खंडाईत   उपस्थित होते. उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांनी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  जयंती थोडयाच लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

राज्यातील ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठयाचे योग्य नियोजन - अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे.

इमेज
मुंबई : -   दि .  ३० : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा समप्रमाणात होण्याच्या दृष्टीने त्याच प्रमाणे रेमडेसिवीरच्या उपलब्धतेबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषधमंत्री डॉ .  राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे . मेडिकल ऑक्सिजनचे समप्रमाणात वितरण अन्न व औषध प्रशासन ऑक्सिजन पुरवठ्याचे विवरणपत्र तयार करून ते उत्पादक व जिल्ह्यांना नियमितपणे देत असून दिनांक-२९.४.२०२१ साठी १६३६ टनाचे विवरणपत्र देण्यात आलेले आहे. याप्रमाणे वितरण केल्या जाण्यासाठी प्रशासनाद्वारे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये मेडीकल ऑक्सिजनचे उत्पादन करणाऱ्या आयनॉक्स इंडिया ,  लींडे ,  एअर लिक्विड ,  टायो निप्पॉन ,  जे एस डब्ल्यू या पाच प्रमुख कंपन्या आहेत. याव्यतिरिक्त देखील अनेक छोटे उत्पादक आहेत त्यांचे देखील उत्पादन वाढले आहे या सर्व उत्पादकांचे मिळून सुमारे १२७० टन इतके ऑक्सिजन उत्पादन रोज होत आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी त्यांचे पत्र दि. २४ एप्रिल ,...

कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यातील कामगार बांधवांना कामगार मंत्र्यांच्या शुभेच्छा.

इमेज
राज्याच्या विकासात कामगारांचे योगदान महत्वाचे कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कामगार विभाग  कटिबद्ध  कामगार - मंत्री हसन मुश्रीफ मुंबई : -   दि.३० : गेल्या वर्षभराहून   अधिक काळ आपण सर्व जण कोविड-१९ या विषाणूविरोधात एकजूटीने लढत आहोत. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढताना दिसत असल्याने राज्यात १५ मे पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्य शासनाने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी जाहीर केलेली मदत कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कामगार विभाग काम करीत आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत राज्यातील कामगारांचे अनन्यासाधारण महत्व आहे. महाराष्ट्र हे अनेक कामगार कायद्यांचे जनक आहे. राज्य शासन महाराष्ट्रातील कामगारांच्या सुरक्षेला ,  आरोग्याला आणि एकंदरच सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन विविध कायदे कामगारांच्या हितासाठी राबवित आहे. यापुढील काळातही महाराष्ट्रात कामगारांचे हक्क आणि त्यांचे हित अबाधित ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. गेल्या वर्षभरात आपण प्राधान्याने कामगारांसाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.यापुढी...

चित्रमहर्षी दादासाहेब फाळके जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन.

इमेज
मुंबई : -  दि.30 :  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ,  चित्रमहर्षी दादासाहेब फाळके साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना ,  अलौकिक कर्तृत्वाला विनम्र अभिवादन. भारतीय चित्रपटसृष्टीला आज लाभलेल्या वैभवामागे चित्रमहर्षी दादासाहेबांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी व केलेले परिश्रम आहेत. भारतात चित्रपटनिर्मिती करण्याच्या ध्येयापोटी त्यांनी लंडनमध्ये जावून चित्रपटनिर्मितीचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक कलात्मक तसेच तांत्रिक बाजू आत्मसात केल्या. ' राजा हरिश्चंद्र '  हा मूकपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. दादासाहेबांसारख्या मराठी माणसानं रचलेल्या पायावर आज भारतीय चित्रपटसृष्टी अनेक दृष्टीनं समृद्ध झाली आहे ,  दिमाखदार कामगिरी करत आहे ,  ही बाब अभिमानाची व प्रेरणादायी आहे. चित्रमहर्षी दादासाहेबांना भावपूर्ण आदरांजली.

“ज्येष्ठ विधिज्ञ सोली सोराबजी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते होते”- राज्यपाल कोश्यारी.

इमेज
मुंबई : -  दि.30 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ज्येष्ठ विधिज्ञ तसेच माजी   ऍटर्नी   जनरल पद्म विभुषण सोली सोराबजी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोली सोराबजी देशातील घटनातज्ञ आणि विधिज्ञांमध्ये अतिशय आदरणीय नाव होते. सोराबजी मुलभूत अधिकार तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खंदे पुरस्कर्ते होते. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय घटनांवर अभ्यासपूर्ण व्यक्त होणारे ते प्रखर विचारवंत होते. त्यांच्या निधनामुळे देशाने एक महान विधिज्ञ आणि विचारवंत गमावला आहे. मी दिवंगत सोराबजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोक संवेदना त्यांच्या कुटुंबियांना कळवतो ,  असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन.

इमेज
मुंबई : -   दि .  ३० :-   राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले . वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री .  ठाकरे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला . अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात ,  राष्ट्रीय एकात्मता आणि ग्रामविकासाचे स्वप्न रुजविण्यासाठी तुकडोजी महाराज यांनी आयुष्य वेचले .  प्रबोधनातून समाजातील अनिष्ट प्रथांवर आघात केला .  ग्रामगीतेच्या माध्यमातून   गावांना स्वयंपूर्ण होण्याचा उपदेश केला .  समाजाला एकसंध ठेवण्याचे त्यांचे विचार आजच्या काळातही प्रेरणादायी आहेत .  महान संत तुकडोजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन .

महाराष्ट्र दिन फक्त जिल्हा मुख्यालयातच होणार साजरा.

इमेज
गडचिरोली : - दि.29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ दिनांक 1 मे रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार असून फक्त जिल्हा मुख्यालयातच साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र दिन कार्यक्रम साजरा करणेबाबत शासन स्तरावरून परिपत्रका द्वारे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र दिन समारंभाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आमंत्रितांसाठीच असणार असून सकाळी 8.00 वाजता आयोजित करण्यात आलाआहे. जिल्हा मुख्यालय सोडून जिल्ह्यात इतर कुठल्याही कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

राज्याचा औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे अनावर, मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते आज संपन्न.

इमेज
गडचिरोली : -  दि.2 9:   राज्यासाठी  औद्योगिक उत्पादन निर्देशांक( Index of Industrial Production ) तयार करण्यासाठी वेब पोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले. याप्रसंगी उद्योग मंत्री श्री.सुभाष देसाई ,नियोजन व वित्त राज्य मंत्री श्री.शंभुराजे देसाई , उद्योग राज्य मंत्री श्रीमती आदिती तटकरे ,नियोजन विभाग व उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव, केंद्रिय सांख्यिकी कार्यालयाचे अधिकारी ,उद्योग आयुक्त ,अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक ,  Industry Associates  चे प्रतिनिधी , अर्थ व सांख्यिकी संचालनालय व उद्योग संचालनालयाचे सर्व अधिकारी ऑनलाईन उपस्थीत होते.   राज्याचा  औद्योगिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे, राज्याचे औद्योगिक धोरण निश्चीत करणे,औद्योगिक विकासाच्या योजना ठरविणे यासाठी औद्योगिक क्षेत्रातील चढउताराचे मोजमाप आवश्यक असते.महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकदृष्ट्या अग्रेसर राज्य असुन देशाच्या औद्योगिक उत्पादनामध्ये तसेच एकुण उत्पन्नामध्ये राज्याचा हिस्सा मो...

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते 1 मे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न होणार.

इमेज
गडचिरोली : -  दि.2 9:     सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राज्यमंत्री राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर यांच्या हस्ते 1 मे ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे.

गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालय जिल्हयाची गरज पूर्ण करत आहे - मंत्री, विजय वडेट्टीवार.

इमेज
सद्यस्थिती व विविध उपाययोजनांचा घेतला आढावा गडचिरोली  : दि-29- जिल्हयात कोरोना उपचाराबाबत एकही खाजगी हॉस्पीटल्स नसताना जिल्हयातील सर्व कोविड रूग्णांना आवश्यक आरोग्य सेवा देवून ,  जिल्हा सामान्य रूग्णालयाने जिल्हयाची गरज पुर्ण केली आहे असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे केले. ते कोरोनाबाबत सद्यस्थिती व विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी गडचिरोली येथे आले होते. वडेट्टीवार यांनी जिल्हयातील ऑक्सिजन ,  रेमडीसिवर ,  बेड्सची उपलब्धता यावर माहिती जाणून घेतली.  यावेळी त्यांनी जिल्हयातील रूग्णांना आवश्यक मदत देण्यासाठी सहकार्य करा व रूग्णांची तपासणी प्रोटोकॉल नूसार करून चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी पुढाकार घ्या असे निर्देश उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांना दिले. जिल्हयातील आरोग्य यंत्रणा टीम वर्कने अतिशय चांगले कार्य करत असल्याचे मंत्र्यांनी यावेळी उद्गार काढले. बैठकीमध्ये मंत्री महोदयांना कोविड परिस्थितीबाबतची माहिती डॉ.अनिल रूडे यांनी दिली. यावेळी नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंज...

आज गडचिरोली जिल्ह्यात 12 मृत्यूसह 561 नवीन कोरोना बाधित तर 603 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : -  दि.2 9:   आज जिल्हयात  561  नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज  603  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 20 658  पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 15 650  वर पोहचली. तसेच सद्या 4 624  सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 3 84  जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज  12  नवीन मृत्यूमध्ये  55  वर्षीय पुरुष आंबेशिवनी गडचिरोली, 58 वर्षीय पुरुष वडसा, 46 वर्षीय महिला गडचिरोली, 48 वर्षीय पुरुष जामगिरी ता. चामोर्शी,  75 वर्षीय  महिला वडसा, 62 वर्षीय महिला  लाखांदूर जि. भंडारा, 54 वर्षीय पुरुष सोनापूर, गडचिरोली, 75 वर्षीय पुरुष वैरागड, ता. आरमोरी, 65 वर्षीय पुरुष कडोली , ता. कुरखेडा, 38 वर्षीय पुरुष बोडधा, ता. वडसा, 53 वर्षीय पुरुष इंजेवारी , ता. आरमोरी, 63 वर्षीय पुरुष सिंदेवाही, जि. चंद्रपूर ,यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 75.5...

आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा जिल्हा दौरा.

इमेज
गडचिरोली : - दि-27 इमाव बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार बुधवार, दि. 28 एप्रिल 2021 रोजी दुपारी गडचिरोली येथे कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुपारी गडचिरोली सामान्य रुग्णालय व कोव्हीड सेंटरला भेटही देणार आहेत. सायं.जिल्हाधिकारी कार्यालय येथे कोव्हिड आढावा  बैठक व  रात्री मुक्काम आहे. गुरुवार, दि. 29 एप्रिल 2021 रोजी गडचिरोली येथून चंद्रपूरकडे रवाना होतील.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून नागरिकांकरीता रुग्णवाहिकेचे दर निश्चित.

इमेज
गडचिरोली : -  दि.27: कोरोना महामारीच्या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात राहणाऱ्या नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी आणि रुग्णांना अत्यंत सुलभ दरात तातडीने सेवा उपलब्ध व्हावी याकरिता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने दि. 20 डिसेंबर 20 नुसार पुढीलप्रमाणे रुग्णवाहीकांचे दर निश्चित केलेले आहेत. 100 कि.मी. किंवा 24 तासाकरीता रुग्णवाहीकांचे भाडेदर हे पुढील प्रमाणे आहेत. मारुती -1500 रु., टाटा सुमो-1700 रु., विंगर- 1900 रु., ट्रॅव्हलर - 2000 रु. वातानुकुलीत यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमुद दरामध्ये 10 टक्के वाढ राहणार आहे. तसेच त्यानंतर प्रति कि.मी. दर पुढीलप्रमाणे असतील मारुती-9रु., टाटा सुमो-10 रु., विंगर -11 रु., ट्रॅव्हलर-13 रु., वातानुकुलीत यंत्रणा वाहनात बसविली असल्यास नमुद दरामध्ये 10 टक्के वाढ. हायटेक किंवा अत्याधुनिक यंत्र सामुग्रीने सुसज्जीत रुग्णवाहीकांचे दर वर नमुद दरामध्ये 50 टक्के वाढ असेल. व डॉक्टर आणि नर्सिंग स्टॉफ यांच्याकरिता येणारा खर्च जी व्यक्ती किंवा संस्था रुग्णवाहीका भाडयाने घेईल त्यांना करावा लागेल. उपरोक्त नमुद करण्यात आलेल्या द...

आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्या- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे आवाहन.

इमेज
मुंबई : -  दि. 27 :   कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा महत्वपूर्ण टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून 18 वर्षांपुढील सर्वजण लस घेऊ शकणार आहेत. लस घेतल्यानंतर 60 दिवस आपणास रक्तदान करता येत नाही ,  त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीची मात्रा घेण्यापूर्वी रक्तदान करावे ,   असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन ,  मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. श्री.  वडेट्टीवार म्हणाले ,  आता रुग्णालयांमध्ये कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्‍यकता भासत आहे. त्यातच कोरोना लस घेतल्यावर 60 दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्या त्यासाठी 28 एप्रिल नंतर  cowin.gov.in .  या अधिकृत संकेतस्थाळावर ऑनलाइन नोंदणी करा.  कोरोनामुळे मागील वर्षापासून रक्तदानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.  रक्ताचा तुटवडा पाहून  सामाजिक भान जपून  रक्तदान करा. त्यामुळे रक्ताची मागण...

आज गडचिरोली जिल्ह्यात 11 मृत्यूसह 641 नवीन कोरोना बाधित तर 424 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : -  दि.25: आज जिल्हयात 641 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 424 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 18645 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 13799 वर पोहचली. तसेच सद्या 4524 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 322 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 11 नवीन मृत्यूमध्ये ता.आरमोरी जि. गडचिरोली येथील 50 वर्षीय पुरुष, चामोर्शी रोड, गडचिरोली येथील 41 वर्षीय पुरुष, ता. मुल जि. चंद्रपूर येथील 65 वर्षीय महिला, ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथील 80 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 49 वर्षीय पुरुष, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 40 वर्षीय महिला, ता. आरमोरी जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. लाखांदुर जि.भंडारा येथील 72 वर्षीय पुरुष, ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण...

आज गडचिरोली जिल्ह्यात 15 मृत्यूसह 497 नवीन कोरोना बाधित तर 283 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : -  दि.23:  आज जिल्हयात 497 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 283 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 17433 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 13056 वर पोहचली. तसेच सद्या 4082 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 295 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 15 नवीन मृत्यूमध्ये 67 वर्षीय महिला ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर ,   67 वर्षीय पुरुष जि.चंद्रपूर  ,   54 वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली ,  65 वर्षीय महिला आरमोरी ,  34 वर्षीय पुरुष पोलिस कॉलोनी गडचिरोली ,  59  वर्षीय पुरुष विवेकांनद नगर गडचिरोली  ,  40 वर्षीय पुरुष वडसा  ,  54 वर्षीय पुरुष कुरखेडा  ,  65 वर्षीय महिला वडसा  , 72  वर्षीय पुरुष विसारा ता.वडसा  ,  69 वर्षीय पुरुष आरमोरी  ,  52  वर्षीय पुरुष अहेरी ,  44 वर्षीय पुरुष आमगाव ता.वडसा ,  33 वर्षीय महिला चंद्रपूर ,   40 वर्षी...

कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना.

गडचिरोली : -  दि. 23 :      राज्यात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत राज्य शासनाच्या  ' ब्रेक द चेन '   मोहिमेअंतर्गत 14 एप्रिल पासून ते 30 एप्रिल 2021 पर्यंत जिल्हयात‍ कलम 144 (संचारबंदी) जाहीर करण्यात आलेली असून अत्यावश्यक सेव वगळता इतर दुकाने व आस्थापना बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे. या संचारबंदीच्या काळात जिल्हयातील कामगारांच्या अडीअडचणी  सोडविण्याच्य दृष्टीने सरकारी कामगार अधिकारी यांचे कार्यालय प्रशासकीय संकुल बॅरेक क्रमांक 02 गडचिरोली येथे नियंत्रण कक्ष/ मदत कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे.  जिल्हयातील कामगारांनी संचारबंदीच्या काळात त्यांचे कामगार कार्यालयाशी संबंधित प्रश्न/समस्या सदरहु नियंत्रण कक्षातील दुरध्वनी क्रमांक 07132-222412 किंवा ई-मेल आयडी  glogadchiroli@gmail.com   यावर लेखी नोंदवावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यांनी कळविले आहे.

25 एप्रिल ला जिल्हयात जागतिक हिवताप दिन साजरा होणार.

इमेज
गडचिरोली : -  दि. 23 :      25 एप्रिल जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय किटकजन्य    रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत 25 एप्रिल जागतिक हिवताप दिन जागतिक स्तरावर साजरा केला जातो. जागतिक स्तरावर गेल्या काही दशकात हिवतापवर मात करण्यासाठी जे काही प्रयत्न केले आहे. त्याची आठवण म्हणून जागतिक हिवताप दिन म्हणून 25 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. हिवतापवर मात करायचे असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेचा प्रयत्न बरोबरच जनतेचा सहभाग व सरकारी महत्वाचे आहे. सर्वांनी एकाच वेळी प्रयत्न केले तर हिवतापाचा पराभव होईल. या दुष्टीने जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षीचा घोष वाक्य हिवतापाला  " झिरो करु, आरोग्य धेय साकार करु "  हे दिले आहे. या पार्श्वभूमिवर गडचिरोली जिल्हयातील सर्व आरोग्य संस्थामध्ये हिवताप दिन साजरा करण्यात येत आहे. भविष्यात या आजाराचा उद्रेक होऊन मृत्यु होऊ नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने मोहिम राबविली जाणार आहे. गडचिरोली जिल्हयात प्लाझमोडीअम वायव्हॅक्स व प्लाझमोडीअम फाल्सीफॅरम हे दोन प्रकारचे जंतु...

कल्लेड जंगल परिसरात पोलीस नक्षल चकमकीतील मृत्यूंच्या दंडाधिकारीय चौकशी बाबत.

गडचिरोली : -  दि.23:  मौजा- कल्लेड जंगल परिसरात  ,  दिनांक 6 डिसेंबर , 2017 रोजी गडचिरोली जिल्हा अंतर्गत ,  पोलीस पथक नक्षल शोध मोहिम राबवित असतांना मौजा - कल्लेड जंगल परिसरात पोलीस व नक्षल यांच्यात झालेल्या गोळीबारात दोन पुरुष व पाच महिला असे (सात) 7 अनोळखी ईसम गोळीबारात ठार झाले होते. अनोळखी नक्षल महिलेच्या मृतदेहाची छायाचित्राद्वारे आत्मसमर्पित नक्षल महिलेकडून ओळख पटविण्यात आली असून तिचे नाव विमला असे असल्याचे समोर आले आहे. पंरतू सदर महिलेचे मुळ नाव व पत्ता माहिती झाला नाही. ती तेलगू भाषिक असून तिच्याबाबत अधिक माहिती मिळणेबाबत आवाहन प्रसिद्ध करण्यात आले आहे.  त्याअनुषंगाने  ,  फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम  ,  144 व 176 अन्वये मृत्युच्या कारणांची दंडाधिकारीय चौकशी करुन अहवाल सादर करणेस आदेशीत केले आहे. अनोळखी मृतकाचे दंडाधिकारीय तपास व चौकशी प्रक्रिया  ,  उप विभागीय दंडाधिकारी ,  अहेरी हयांचे न्यायालयात सुरु आहे. तरी वरिल घटनेच्या संबधात ज्यांना निवेदन करावयाचे आहे ,  प्रतिज्ञापत्र सादर करावयाचे आहे ,...

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हयातील कोरोना स्थितीचा घेतला आढावा, स्थानिक आमदारांनीही ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिकेसाठी निधी देण्याचे केले मान्य.

इमेज
मुख्यालयासह व तालुक्यातही ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट.  नगर पालिकांना प्रत्येकी 5 कोटी रु. कोविड उपाययोजनांसाठी तातडीचा निधी. गडचिरोली : -   दि.23 एप्रिल (जिमाका) :  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हयात ऑक्सिजन पुरवठा ,  बेड्सची नव्याने निर्मिती करण्यासह रेमडीसीवर औषधांच्या पुरवठयाबाबत तातडीने मंजूऱ्या मिळतील अशी ग्वाही दिली. जिल्हयाच्या ऑक्सिजन ,  रेमडीसीवर व इतर औषधांचा मंजूर व अतिरीक्त कोठ्यासाठी पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित सचिवांना दूरध्वनी द्वारे मागणी केली. यावेळी जिल्हयात तातडीने सदर मागणी पुर्ण केली जाईल असे ते यावेळी म्हणाले. गडचिरोली जिल्हयातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता त्यांनी आज आरोग्य विभागासह जिल्हयातील महत्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला ,  मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद ,  पोलीस अधीक्षक अंकित गोयल ,  आमदार डॉ.देवराव होळी ,  आमदार कृष्णा गजबे व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांनी जिल्हयातील ऑक्सिजन बेड वाढविणे आवश्यक असल्याचे...

कोरोना काळात को-ऑपरेटीव्ह बँक व्यवस्थापकाचे बँकेच्या ग्राहकांकडे दुर्लक्ष.

इमेज
दिक्षा झाडे- तालुका प्रतिनिधी, एटापल्ली एटापल्ली : - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्र सरकार ने जमाबंदी व संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक दुकाने, शासकीय कार्यालयात, औषध दुकाने, दवाखाना, बँका वगळता इतर सर्व बंद आहेत. कोरोना काळात गर्दी होऊ नये म्हणून अनेक उपाय योजना करून कामे केली जात आहे.  परंतुु दि-गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को. ऑप. बँक शाखा, एटापल्ली येथे ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना व उन्हाळा असून सुद्धा बँक ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. सध्या सर्व दुकाने बंद असल्यामुळे ग्राहकांना पाण्यासाठी वन-वन भटकावा लगत आहे.भर उन्हात बँकेचे समोर उभा राहावा लागतो. बँकेकडून पेन्डालची व्यवस्था केली पाहिजे, परंतु बँक व्यवस्थापक याकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोना काळात सोशिएल डिस्टन्सचा कायदा सुद्धा मोडत आहे. बँके समोर खुप गर्दी बघायला मिळते. आदीवासी अतिदुर्गम भाग असल्याने लोकांना सोशिएल डिस्टन्स कढत नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे, परंतु याकडे दुर्लक्ष करीत आहे. अश्या परिस्तिथीत कोणालाही कोरोनाची ल...

नामंकित निवासी शाळांमध्ये इयत्ता 1 ली व 2 ली मध्ये प्रवेशा करीता कागदपत्रे जमा करणे.

गडचिरोली : -   भामरागड प्रकल्पातंर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सन 2021-22 या वर्षाकरीता (फक्त इयत्ता 1 ली व 2 री करीता) शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामंकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु आहे. तेव्हा भामरागड व एटापल्ली तालुक्यातील इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेश अर्जा सोबत खाली नमुद केलेले कागदपत्रे जोडून परीपूर्ण भरलेले प्रवेश अर्ज प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड किंवा सुविधा केंद्र आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह एटापल्ली येथे जमा करावे. अर्जासोबत जोडावे लागणारे कागदपत्रे : विद्यार्थ्यांचा नजीक च्या   काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो, पालकाचे रहिवासी प्रमाणपत्र, पालकाचे जातीचे प्रमाणपत्र (असल्यास विद्यार्थ्यांचे), उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांचा) अंगणवाडी दाखला (पहिल्या इयत्तेसाठी/ग्रामसेवका चा   दाखला), दारिद्रय रेषेखाली असल्यास त्या बाबतचा दाखला ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र / दाखला., महिला पालक विधवा/घटस्फोटित /निराधार/ प रितक्त्या असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा दाखला, आधारकार्ड झेराक्स प्रत अत्यंत आवश्यक (विद्यार्थ...

कोविड नियंत्रण कक्षातून मिळणार उपचारासाठी रूग्णांना मदत.

इमेज
जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण पुर्ण. गडचिरोली : -   दि.22 ,  :  जिल्हयातील वाढती कोरोना रूग्ण संख्या पाहता सर्वस्तरावर योग्य सनियंत्रण व अचूक माहितीची गरज असते. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दोन दिवसापुर्वीच सनियंत्रण प्रणालीबाबत आदेश दिले आहेत. आरोग्य विभागाने कोरोना बाबत जिल्हास्तरावर कोविड नियंत्रण कक्ष उभारला आहे. याबाबतचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. जिल्हा स्तरावरती कोरोना बाबत नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून या ठिकाणी गृह विलगीकरणातील रूग्णांना मदत मिळणार आहे. तसेच कोरोना बाधित रूग्णांना बेड मिळणसाठीचे तपशील या ठिकाणी दिले जाणार आहेत. या कोरोना नियंत्रण कक्षामध्ये सद्या फक्त बेड्सची उपलब्धता व गृह विलगीकरणाविषयी माहिती दिली जाणार आहे. यासाठी संपर्क क्रमांक आहेत  222030 ,  222035 ,  222031 . या नियंत्रण कक्षाच्या कामकाजाबत जिल्हास्तरावरील यंत्रणेचे प्रशिक्षण डॉ.विनोद मशाखेत्री यांचेकडून देणेत आले असून उर्वरीत व्यक्तींचे प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपात घेतले जाणार आहे. या नियंत्रण  कक्षामधून आरोग्य विभागाच्या अंतर्गत कामकाजाब...

गडचिरोलीत कोरोना रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण रणनिती, कोविड नियंत्रण कक्षासह, जबाबदाऱ्या व कामांचे वाटप - जिल्हाधिकारी दीपक सिंगला

इमेज
मृत्यूदर व रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आरोग्य यंत्रणेला निर्देश. गडचिरोली : -  दि.22:  ' मिशन ब्रेक द चैन '  मोहिमअंतर्गत गडचिरोली जिल्हयात प्रशासनामार्फत कोरोना रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण रणनिती तयार करण्यात आली आहे. जिल्हयातील वाढती कोरोना रुग्णसंख्या व कोरोनामूळे होणारे मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा देण्याच्या पध्दती ,  कामांचे वाटप व औषधोपचार ठिकाण याबाबतचे लेखी आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिले आहेत. आरोग्य विभागातील अधिकारी ते डॉक्टर ,  नर्स  ,  वार्ड बॉय ,  ड्रायव्हर अशा प्रत्येक स्तरावरील कोरोना योध्दयांसाठी त्यांच्या त्यांच्या कामात सुसूत्रीपणा येण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. तसेच जिल्हस्तरावरती व इतर 11 तालुक्यांमध्ये पूर्णवेळ 24 x 7 असा कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नॅशनल अर्ली वॉर्निग स्कोर ( News 2) द्वारे रुग्णावर कशाप्रकारे व कोणत्या ठिकाणी उचचार केले जातील याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत. सदर गुणांकानूसार प्रत्येक रुग्णाला गृहविलगी...

आज गडचिरोली जिल्ह्यात 19 मृत्यूसह 417 नवीन कोरोना बाधित तर 354 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : -  दि.22:  आज जिल्हयात 417 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 354 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित  16936  पैकी कोरोनामुक्त  झालेली  संख्या  12773  वर पोहचली. तसेच सद्या 3883 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 280 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 19 नवीन मृत्यूमध्ये 65 वर्षीय महिला अहेरी ,   63 वर्षीय पुरुष कुरखेडा  ,   63 वर्षीय पुरुष आरमोरी ,  27 वर्षीय पुरुष वडसा ,  70 वर्षीय महिला पुराडा कुरखेडा ,  52 वर्षीय महिला लाझेंडा गडचिरोली ,  57 वर्षीय महिला गणेश कॅलोनी गडचिरोली  ,  55 वर्षीय पुरुष आलापल्ली  ता.अहेरी  ,  66 वर्षीय पुरुष विदर्भ नगर ब्रम्हपूरी जि.चंद्रपूर  , 65  वर्षीय पुरुष विसारा ता.वडसा  ,  57 वर्षीय पुरुष ता.मुल जि.चंद्रपूर  ,  48  वर्षीय पुरुष राजेन्द्र वार्ड वडसा ,  43 वर्षीय पुरुष सु...

खाद्यान्न दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंतच राहणार सुरू.

इमेज
राज्य शासनाच्या नवीन निर्देशा नूसार जिल्हाधिकारी यांचे आदेश. जिल्हयातील बँकाच्या वेळेतही बदल गडचिरोली : -  दि.20: राज्य  शासनाच्या नवीन आदेशामधील तरतुदीच्याण अनुषंगाने गडचिरोली जिल्हवयातही आता खाद्यान्न दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंतच राहणार सुरू राहणार असल्याबाबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हाादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी मिशन ब्रेक द चैन अंतर्गत अंतर्गत नवीन आदेश 20 एप्रिल रोली निर्गमित केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या बाबींना यात किराणामालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळविक्रेते, दूधपुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, पशुखाद्य दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, मासे, अंडी इ.), कृषी संबंधित दुकाने, पावसाळ्याकरिता लागणारे साहित्य व इतर सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने इत्यादी सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत या कालावधीत दुकाने/सेवा सुरु ठेवण्याची अनुमती असणार आहे. आरोग्य सेवा, रूग्णालये, मेडिकल, इत्यादींना सद...

आज गडचिरोली जिल्ह्यात 15 मृत्यूसह 615 नवीन कोरोना बाधित तर 287 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : -  दि. 20:   आज जिल्हयात  615  नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज  287  जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित  15929  पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या  12242  वर पोहचली. तसेच सद्या  3447  सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण  240  जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज  15  नवीन मृत्यूमध्ये  55  वर्षीय पुरुष अहेरी ,  65  वर्षीय महिला नवेगाव  ,  गडचिरोली ,  72  वर्षीय पुरुष माडगांव ता. लाखांदूर जि. भंडारा , 82  वर्षीय पुरुष चामोर्शी , 44  वर्षीय महिला आरमोरी , 52  वर्षीय पुरुष गडचिरोली , 45  वर्षीय पुरुष माडेतुकूम ,  गडचिरोली , 70  वर्षीय पुरुष घोट , ता. चामोर्शी ,  69  वर्षीय पुरुष चामोर्शी , 53  वर्षीय पुरुष उमरेड ,  जि.नागपूर , 49  वर्षीय पुरुष गडचिरोली  , 52  वर्षीय पुरुष ...

महावीर जयंती उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी.

इमेज
मुंबई  : - दि. 20-  संपूर्ण राज्यात महावीर जयंती उत्सव जैन बांधवांमार्फत  मोठ्या प्रमाणात व  उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा 25 एप्रिल रोजी महावीर उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. त्या दृष्टीकोनातून महसुल व वन तसेच आपत्ती व्यवस्थापन ,  मदत व पुनर्वसन विभाग यांच्या 13 एप्रिल च्या आदेशांमधील तरतुदींच्या अधिन राहून या वर्षी महावीर जयंती उत्सव साजरा करणे आवश्यक आहे. . कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण ,  उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने गृह विभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. महावीर जयंती उत्सव लोक मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने महावीर जयंती  उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्य...

श्रीराम नवमी उत्सव साजरा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी.

इमेज
मुंबई : -  दि. 20 :  कोरोना संकटामुळे यावर्षी सर्व धर्मीय सण ,  उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. संपूर्ण राज्यात श्रीरामनवमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.राज्यात सुरु असलेला कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महसुल व वन विभाग ,  आपत्ती व्यवस्थापन ,  मदत व पुनर्वसन मंत्रालय ,  मुंबई यांच्या 13 एप्रिलच्या आदेशातील तरतुदींच्या अधिन राहुन यावर्षी 21 एप्रिल रोजी येणारा श्रीरामनवमी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने गृह विभागामार्फत खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. श्रीरामनवमी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन साजरी करतात. परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लोकांनी एकत्र न येता साधेपणाने आपआपल्या घरी साधेपणाने श्रीरामनवमी उत्सव साजरा करावा. दरवर्षी श्रीरामनवमी साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु कोविड- 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा अर्चा व दर्शनासाठी जाता...

खाद्यान्न दुकाने सकाळी 8.00 ते दुपारी 3.00 वा. पर्यंतच राहणार सुरु.

इमेज
"मिशन ब्रेक द चैन" अंतर्गत केले काही बदल विविध इमारतींचे आरोग्य सुविधांच्या निर्मितीसाठी अधिग्रहण- गडचिरोली : -  दि.19:अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या खाद्यान्न बाबींना यात किराणामालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळविक्रेते, दूध पुरवठा केंद्रे(दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, पशुखाद्य व इतर सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने इत्यादी आता सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये सकाळी 8.00 ते दुपारी 3.00  वाजेपर्यंत या कालावधीत सुरु ठेवण्याची अनुमती असेल. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची वाढती संख्या लक्षात घेऊन यापूर्वी दिलेल्या आदेशामध्ये बदल केला आहे. आरोग्य सेवा, संबंधीत रूग्णालये, मेडिकल, इत्यादींना मात्र सदर वेळेचे बंधन लागु राहणार नाही. आता दुपारी 3.00 वा. नंतर  कारणांशिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला ये-जा करता येणार  नाही. अपवादात्मक परिस्थितीत औषधे घेण्याकरीता जायचे असल्यास सोबत वैध औषधोपचार चिठ्ठी सोबत असणे आवश्यक राहील. अत्यावश्यक बाबी मध्ये पुढील अतिरीक्त बाबींचा नव्याने समावेश - वन विभागामार्फत मंजूर असलेले वनीकरणा संद...

आज जिल्ह्यात बारा मृत्यूसह 305 नवीन कोरोना बाधित तर 263 कोरोनामुक्त.

इमेज
गडचिरोली : -  दि.19: आज जिल्हयात 305 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 263 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 15314 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11955 वर पोहचली. तसेच सद्या 3134 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 225 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज 12 नवीन मृत्यूमध्ये 59 वर्षीय पुरुष, कुरखेडा , 71 वर्षीय पुरुष मड्डीगुडम ता.अहेरी, 45 वर्षीय पुरुष अहेरी , 70 वर्षीय महिला चामोर्शी, 42 वर्षीय पुरुष कोंडाळा ता. वडसा, 60 वर्षीय पुरुष बोलदा ता. वडसा, 38 वर्षीय पुरुष मानपूर ता. आरमोरी, 60 वर्षीय महिला अर्जुनी मोरगाव जि. गोंदिया,  60 वर्षीय पुरुष हनुमान नगर , गडचिरोली, 45 वर्षीय पुरुष आरमोरी, 70 वर्षीय महिला विवेकानंद नगर, गडचिरोली, 72 वर्षीय पुरुष  कन्नमवार वार्ड गडचिरोली यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.07 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 20.46 टक्के तर मृत्यू दर 1.47 टक्के झाला.     ...

निर्बंधकाळात नागरिकांसाठी जाहीर केलेली मदत लाभार्थ्यां पर्यंत पोहचवण्याची युद्धपातळीवर कार्यवाही - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश.

इमेज
मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजच्या अंमलबजावणी व निधी वितरणाच्या आढाव्यासाठी बैठक मुंबई : -  दि. 19 : ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लागू निर्बंधकाळात नागरिकांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या 5 हजार 476 कोटींच्या मदत पॅकेजचे लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत तातडीने पोहचले पाहिजेत. त्यासाठी युद्धपातळीवर अंमलबजावणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रशासनाला दिले. सात कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, सामाजिक न्याय विभागाच्या 35 लाख, आदिवासी विभागाच्या 12 लाख लाभार्थ्यांना आगावू मदतीचे तात्काळ वितरण, बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगार, घरेलु कामगार, राज्यातील फेरीवाले, रिक्शाचालक यांच्यासह विविध समाजघटकांसाठी जाहीर केलेल्या मदतीचा निधी तात्काळ वितरित करावा. यासाठी आवश्यक शासन निर्णय, निधी वितरणाचे आदेश जारी झाले आहेत. उर्वरीत आदेशही तात्काळ जारी व्हावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी जाहीर केलेल्या मदत पॅकेजअंतर्गत देण्यात येणारी मदत संबंधित घटकांपर्यंत तात्काळ पोहचवण्याच्या कार्यवा...