कोरोना काळात को-ऑपरेटीव्ह बँक व्यवस्थापकाचे बँकेच्या ग्राहकांकडे दुर्लक्ष.
दिक्षा झाडे- तालुका प्रतिनिधी, एटापल्ली
एटापल्ली : - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत महाराष्ट्र सरकार ने जमाबंदी व संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक दुकाने, शासकीय कार्यालयात, औषध दुकाने, दवाखाना, बँका वगळता इतर सर्व बंद आहेत. कोरोना काळात गर्दी होऊ नये म्हणून अनेक उपाय योजना करून कामे केली जात आहे. परंतुु दि-गडचिरोली डिस्ट्रिक्ट सेन्ट्रल को. ऑप. बँक शाखा, एटापल्ली येथे ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना व उन्हाळा असून सुद्धा बँक ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही. सध्या सर्व दुकाने बंद असल्यामुळे ग्राहकांना पाण्यासाठी वन-वन भटकावा लगत आहे.भर उन्हात बँकेचे समोर उभा राहावा लागतो. बँकेकडून पेन्डालची व्यवस्था केली पाहिजे, परंतु बँक व्यवस्थापक याकडे दुर्लक्ष करीत आहे. कोरोना काळात सोशिएल डिस्टन्सचा कायदा सुद्धा मोडत आहे. बँके समोर खुप गर्दी बघायला मिळते. आदीवासी अतिदुर्गम भाग असल्याने लोकांना सोशिएल डिस्टन्स कढत नाही. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितले पाहिजे, परंतु याकडे दुर्लक्ष करीत आहे. अश्या परिस्तिथीत कोणालाही कोरोनाची लागण झाल्यास बँक व्यवस्थापक व कर्मचारी जवाबदार राहतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा