राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी.

गडचिरोली : - दि.30राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी जी.एम.तळपाडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्र.तहसिलदार किशोर भांडारकर, जिल्हा नाझर डी.ए.ठाकरे, श्री. चंहादे,  दयाराम मेश्राम, जी. आर. मालवी,  जिल्हा माहिती कार्यालयाचे मनोहर बेले, वामन खंडाईत  उपस्थित होते.

उपस्थित अधिकारी / कर्मचारी यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती थोडयाच लोकांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

📰 छल्लेवाड्यातील राजकीय उलथापालथ ! अजय कंकडालवार यांच्या गडातील नागरिकांचा भाग्यश्रीताई आत्राम यांच्या पक्षात प्रवेश.

एटापल्ली-भामरागडमध्ये मुरूम उत्खननाचा मोठा घोटाळा उघडकीस?

नागेपल्ली येथील श्मशानभूमीवर अंतिम संस्कारसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर (वराहपालक) अतिक्रमणकारांचे जीवघेणे हल्ले.