महाराष्ट्र दिन फक्त जिल्हा मुख्यालयातच होणार साजरा.

गडचिरोली : - दि.29 : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिन समारंभ दिनांक 1 मे रोजी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार असून फक्त जिल्हा मुख्यालयातच साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्र दिन कार्यक्रम साजरा करणेबाबत शासन स्तरावरून परिपत्रका द्वारे निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र दिन समारंभाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे आमंत्रितांसाठीच असणार असून सकाळी 8.00 वाजता आयोजित करण्यात आलाआहे.

जिल्हा मुख्यालय सोडून जिल्ह्यात इतर कुठल्याही कार्यालयात सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.