चित्रमहर्षी दादासाहेब फाळके जयंती निमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन.

मुंबई : - दि.30 : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनकचित्रमहर्षी दादासाहेब फाळके साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींनाअलौकिक कर्तृत्वाला विनम्र अभिवादन. भारतीय चित्रपटसृष्टीला आज लाभलेल्या वैभवामागे चित्रमहर्षी दादासाहेबांनी त्याकाळात दाखवलेली दूरदृष्टी व केलेले परिश्रम आहेत. भारतात चित्रपटनिर्मिती करण्याच्या ध्येयापोटी त्यांनी लंडनमध्ये जावून चित्रपटनिर्मितीचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक कलात्मक तसेच तांत्रिक बाजू आत्मसात केल्या.

'राजा हरिश्चंद्रहा मूकपट तयार करुन भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला. दादासाहेबांसारख्या मराठी माणसानं रचलेल्या पायावर आज भारतीय चित्रपटसृष्टी अनेक दृष्टीनं समृद्ध झाली आहेदिमाखदार कामगिरी करत आहेही बाब अभिमानाची व प्रेरणादायी आहे. चित्रमहर्षी दादासाहेबांना भावपूर्ण आदरांजली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुरजागड पहाडीवरून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रक व स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात.

छल्लेवाडा गावातील महिलांचा अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांना दिली तक्रार.

वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून हरिणाची शिकार; मटन शिजवून खाल्ल्याप्रकरणी दोनजण अटकेत.